Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

योगिक जीवनशैली - व्याधीमुक्तीचे सूत्र -1

व्याधी आणि समाधी हे दोन विरूद्धार्थी शब्द आहेत. व्याधींचा प्रचलित अर्थ आपण जाणतोच! पण, ज्ञानेश्वरांनी घेतलेल्या संजीवन समाधीहून येथील 'समाधी'चा अर्थ फार फार वेगळा आहे. जो आमच्या गुरूंनी मा. आचार्य योगानंदांनी आम्हाला शिकवला. व्याधी = व्य + आधि समाधी = सम + आधि धि = पंचमहाभूतांचे शरीरातील प्रमाण.


१. पृथ्वी, २. जल, ३. तेज, ४. वायू आणि ५. आकाश ही पंचमहाभूते आहेत. .. १) शरीरातील हाडे व मांसांचा ठोस भाग, यकृतासारखे मोठे अवयव हे . पृथ्वीतत्वाचे. २) रस-रक्तादी धातू व शरीरातील सर्व प्रकारचे पाणी ओलावा हे जल तत्त्व. निर्माण ३) शरीरातील जाठराग्नि(डायजेस्टीव्ह फायर) शरीराचं तापमान (बॉडी टेम्परेचर) हा अग्नि. ४) शरीरात होणाऱ्या सर्व हालचाली व स्पर्शज्ञान हे वायूतत्त्व. आणि ५) शरीरातील सर्व पोकळ्या - संधी १) म्हणजे आकाश. अशा पाचही एलिमेंट सचं शरीरातलं असणं 'ज्यावेळी जितकं हवं तितकं असेल. नेमकं असेल तर स्वास्थ्य' कमी किंवा जास्त झालं की दखणी ठरलेलीच आहेत. उदा. - १) पृथ्वी तत्त्व वाढलं तर वजन - कोलॅस्टेरॉल - बद्धकोष्ठ - सुस्ती - फार झोप इ. प्रकारच्या व्याधी होतील. २) जल तत्त्व वाढलं तर सूज - विविध ठिकाणी पाणी होणे अशा व्याधी होतील. ३) अग्नि तत्त्व अर्थातच उष्णतेच्या . व्याधी देईल. ४) वायू तत्त्व हालचालींमध्ये विकृती निर्माण करेल. विविध वातव्याधी, वेदना, अर्धांगवात, कंपवात ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. 


Previous Post Next Post