Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

योगिक जीवनशैली - व्याधीमुक्तीचे सूत्र -2

पाहण सापजाइल. ५) आकाश तत्त्वातल्या बिघाडामुळे शरीरातल्या पोकळ्या व संधी विकृत होतील. थोडक्यात, पंचमहाभूतांचं व्यस्त प्रमाण म्हणजे व्याधी, तर पंचमहाभूतांचं संतुलीत प्रमाण म्हणजे समाधी. हा विषय ध्यानात घेतला तर हे संतुलन का बिघडते आणि हे प्रमाण पुन्हा संतुलित कसे करायचे हा विचार पाहणे सोपे जाईल. पंचमहाभूतं ही आपणहून कुठलीही हालचाल करू शकत नाही. त्यांच्यामागे एक चेतना / ऊर्जा असावी लागते. ही ऊर्जा त्यांना हालचाल करण्यास भाग पाडते. हीच आपली जीवनऊर्जा. पचमहाभूतं शरीरामध्ये व्यक्त होण्याचे पाच गुणधर्म आहेत. (१) शब्द, (२) स्पर्श, (३) रूप, (४) रस, (५) गंध इतरही गुणधर्म आहेत पण हे पाच गुणधर्म विशेष. या पाचही गुणधर्मांशी निगडीत एकेक इंद्रिय आहे. (१) शब्दांसाठी - कान - जे आकाश तत्त्वाचे आहेत. (२) स्पर्शासाठी - त्वचा - जी वायू तत्त्वाची आहे. (३) रूपासाठी - डोळे ___- जे अग्नितत्त्वाचे आहेत. (४) रसासाठी - जिव्हा ___- जी जल तत्त्वाची आहे. (५) गंधासाठी - नाक -जे पृथ्वी तत्त्वाचे आहे. या सर्व इंद्रियांच्या अल्प किंवा अती से वनातून किंवा शब्दादी पचगुणाच्या अति किवा अल्प प्रमाणातून शरीरात पंचमहाभूते बिघडतात आणि त्यांचे प्रमाण व्यस्त झाल्यामुळे 'व्याधी' जडतात. आता हे व्यस्त होण्यामागे किंवा संतुलित होण्यामागे 'मन' व 'बुद्धी' यांचेही योगदान असते. काय करावे? काय करू नये? याचा निश्चय बुद्धी करते आणि संकल्प - विकल्प अर्थात इच्छा हे मन करते. या सगळ्यांवर पुन्हा अंकुश आहे चेतनेचा - ऊर्जेचा - आत्म्याचा! या ऊर्जेचं शरीरातलं प्रमाण किंवा शरीरात ही ऊर्जा किती प्रमाणात आहे, यावर ठरेल की पंचमहाभूतांनी 'व्यस्त' राहायचं की 'संतुलित'. म्हणजेच व्याधीग्रस्त राहायचं की समाधीस्थ राहायचं हे ऊर्जा ठरवणार. मग अधिकाधिक ऊर्जासंपन्न राहण्यासाठी - जीवनशैलीच्या दशस्तंभांचं पालन हाच एकमेव (कमशः लेखमाला) संयुक्तीक उपाय ठरेल. अर्थात् योग्य आणि संतुलित मार्ग आहार - झोप - योगाभ्यास - विचार इ. सर्व! त्यामुळे, दशस्तंभांना आपल्या जीवनामध्ये 'अविभाज्य' घटक मानणे व तद्नुसार वर्तणे हे ओघाने आलेच. __ शेवटी सांगण्याचा मतितार्थ हाच की, व्याधी असो वा समाधी - ते शरीरातल्या ऊर्जेवर - ऊर्जेच्या व्यवस्थापनावर अवलंबून आहे. व्यक्तीमत्व जितकं ऊर्जासंपन्न तेवढे संतुलनाचे काम प्रभावीपणे पार पडेल आणि व्यक्ती 'समाधीस्थ' अवस्थेत दीर्घकाळ राहू शकेल. म्हणून यासाठी 'जीवनशैली' संतुलीत असणे अगत्याचे आहे. याचसाठी म्हणालो, व्याधीकडून समाधीकडे व्हाया 'जीवनशैली'. - आचार्य श्री. केदारनाथजी योग व प्राकतिक चिकित्सक अध्यक्ष-हठयोग टेनिंग अॅण्ड रिसर्च इन्सिस्टट्यूट ट्रस्ट


Previous Post Next Post