फोटो क्राईम/प्रतिनिधि
- मुंबई- व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने *शनिवार व रविवार दिनांक 0८ व 0९ फेब्रुवारी २0२0 असे दोन दिवशीय राज्यस्तरीय संपादक व पत्रकारांचे भव्यदिव्य अधिवेशन शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल , अंधेरी पश्चिम , मुंबई* येथे संपन्न होत आहे.
राज्यभरातून प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक मिडीयातील संपादक , पत्रकार , छायाचित्रकार तसेच पत्रकारितेशी निगडीत अनेकांनी आमचेशी संपर्क साधून सदर कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या आहेतच आणि उपस्थित राहण्याचा शब्दही दिला आहे.
अधिवेशन कार्यक्रमात प्रिंट , इलेक्ट्रॉनिक मधील संपादक , पत्रकार , छायाचित्रकारांसह सामाजिक , राजकीय , शैक्षणिक , कला , क्रीडा , सांस्कृतिक , आरोग्य , उद्योग , कृषी , वैद्यकीय , माहिती व तंत्रज्ञान , जिल्हा माहिती अधिकार कार्यालय तसेच महिला उद्योजिका , महिला संस्था आणि स्वकर्तृत्वावर आपल्या कार्याचा ठसा उमठविणाऱ्या महिला भगिनींसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातील व्यक्ती आणि संस्थांना तज्ञ समितीच्या निवडीतून राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
या अधिवेशनासाठी अनेक मंत्रीमहोदय , खासदार , आमदार यांचे उपस्थितीत कार्यक्रमाचा अद्वितीय-अविस्मरणीय असा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे तर प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियातील अनेक दिग्गज संपादक , पत्रकार यासह वरिष्ठ आयएएस , आयपीएस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनपर मनोगत , पत्रकारितेशी संबंधीत व पत्रकारांच्या माहितीकरीता पोस्टर प्रदर्शन आणि सांस्कृतिक मनोरंजनाचा कार्यक्रम इत्यादी-इत्यादी प्रकारे डोळे भरुन साठवून ठेवण्यायोग्य कार्यक्रमाने भरगच्च असे दोन दिवसाचे अधिवेशन उपस्थित प्रत्येकास पाहण्यास - अनुभवास मिळणार आहे.
सदर कार्यक्रमास संपूर्ण महाराष्ट्रातून प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक मिडीयातील संपादक , पत्रकार , छायाचित्रकार , टिव्ही वाहिन्यांवरील निवेदक तसेच दैनिक , साप्ताहिक, मासिक, न्यूज पोर्टल, यूट्यूब चॅनल, डिजिटल मिडियाचे सर्व संपादक, पत्रकार, वार्ताहर, कॅमेरामन आदी पत्रकार बांधवांनी या राज्यस्तरीय अधिवेशनात सहभागी व्हावे असे अहवान प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने केले आहे.
*अधिक माहितीसाठी संपर्क*
प्रा. आंबेगावे डी. टी.
संस्थापक अध्यक्ष
मो.9270559092 / 7499177411
श्री उदय चौगुले
राज्य कार्याध्यक्ष
मो 8208643949
श्री संजय भैरे
प्रदेश सरचिटण
मो.9819991194
श्री.सुरेश घारे
प्रदेश उपाध्यक्ष
9833770515
श्री. सागर पाटील
मो.8108539884
श्री पंडित मोहिते पाटील
प्रदेश उपाध्यक्ष
मो 9822343362