उदगीर/प्रतिनिधि
डी.के.उजळंबकर
उदगीर - वर्षे पुर्वी ब्राड गेज म्हणून आस्तितत्वात असलेल्या येथील रेल्वे स्थानकात पादचारी पुलाचे काम रखडल्याने प्रावाशांतुन तीव्र असंतोष व्यक्त केला जात सदर काम पूर्ण करण्यासाठी 31 जानेवारी डेड लाईन असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली असुन काम पूर्ण कधी होईल याकडे प्रवाशांच्या नजरा लागल्या आहेत.
तीन राज्याच्या सीमेवर असलेल्या उदगीरातील रेल्वे स्थानक ची स्थापना सन 1942 झाली. सदर रेल्वे स्थानक हे मराठवाडय़ातील पहिले ब्राडगेज रेल्वे लाईन असलेले रेल्वे स्थानक.
तात्कालीन खा. वाघमारे यांनी सदर रेल्वे स्थानक दत्तक घेतले होते. यावेळी या स्थानकाचा चेहरामोहरा बदला. कालंतराने या रेल्वे स्थानकात संगणकीय रेल्वे आरक्षण सुविधा चालु करण्यात आली ती आजही चालू आहे.
या रेल्वे स्थानकातून रेनीगुंटा तिरूपती शिर्डी बेंगलोर हैद्राबाद औरंगाबाद येथे जाण्यासाठी प्रवाशांना सोय झाली. वाढती प्रवाशांची संख्या पाहता दुसरा रेल्वे प्लाँट फार्म सुद्धा या स्थानकात आहे. या दोन प्लाँट फार्म ला जोडण्यासाठी पादचारी पुलाचे काम मागील वर्षी सुरू करण्यात परंतु सदर काम रखडल्याचे दिसून येत आहे.
या रेल्वे स्थानकात विविध सोयी सुविधा मिळाव्या साठी रेल्वे संंघर्ष समितीचे चे सचिव मोती डोईजोडे यांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनास संपर्क साधत प्रयत्न
केले. या स्थानकातल्या पादचारी पुलाचे काम कधी चालू होईल अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.