लातूरकरांना धरले महापलिकेने वेठिस
15दिवस उलटूनही नळाला पाणी नाही
आधी अधिकारी,कर्मचारी आणि गूत्तेदारांकडून वसूलपात्र रक्कम वसूल करा, लातूरकरांची मागणीी
अधिकारी, कर्मचारी यांच्या मनमानी कारभारा मुळेच लातूरकरांची परवड
लातूर शहर महानगरपालिकेची विज बिल थकबाकीमुळे महावितरण कंपनीने मनपाच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्याने लातूरकरांना निर्जळी राहावे लागत आहे. डिसेंबर व जानेवारी महिन्यात आज रोजी पर्यंत जवळपास १ कोटी ८४ लक्ष रुपयाचा वीजबिल भरणा करण्यात आलेला आहे. मनपाच्या तिजोरीत खडखडाट असल्याने चालू वीज बिलाचा भरणा करणे शक्य होत नाही तरीही यातून मार्ग काढत वीज बिलाचा भरणा करण्याचा प्रयत्न मनपा करीत आसल्याचे सांगीतले जात आहे, परंतु मांगील काही दिवसा पूर्वी स्वीकृत नगरसेवक प्रकाश पाठक यांनी महानगरपालिकेचा 2011ते2016या कालावधीत तब्बल 1000करोड रूपयाचा घोटाळा अधिकारी कर्मचारी व गुत्तेदार मिळून केल्याचे सांगीतले, विशेष म्हणजे ज्या गुत्तेदारांकडून आणि संस्थांकडून करोडोरूपयाची वसूलपात्र रक्कम वसूल करायची आहे ती आजतागात वसूल करण्यात आली नाही,ती जर वसूल केली असती तर आज लातूरकरांची पाण्यासाठी हाल झाले नसते,अशी लातूर च्या नागरिकांकडून बोलले जात आहे.
महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सक्षम नसली तरीही वीज बिलाचा भरणा करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून नागरिकांनीही कर भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.