Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

चाईल्ड पार्नोग्राफीच्या तब्बल 150 VIDEO झाले अपलोड, दोघांना अटक

 


चाईल्ड पार्नोग्राफीच्या तब्बल 150 VIDEO झाले अपलोड, दोघांना अटक


सांस्कृतिक शहर आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात चाईल्ड पार्नोग्राफीचे 100 ते 150 व्हिडिओ अपलोड झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.


पुणे, 06 फेब्रुवारी : 'चाईल्ड पॉर्नोग्राफी'वर बंदी असताना असताना दररोज असे प्रकार उघडकीस आलेले पाहायला मिळतात. बालकांच्या लैंगिक शोषण संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होतात. दरम्यान सांस्कृतिक शहर आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात चाईल्ड पार्नोग्राफीचे 100 ते 150 व्हिडिओ अपलोड झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.


पुण्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाकडून ही माहिती उघड केली. दरम्यान, पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. राजकुमार पुट्टीलाल आणि मनोजकुमार सरोज या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे


 चाइल्ड पोर्नोग्राफी ची तपासणी कशी होते 


ही माहिती जमवण्यासाठी इंटरनेट सेवा देणाऱ्यांपासून ते विविध सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. यात नग्नता आणि मुलांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून या व्हिडीओची तपासणी केली जाते. बाल पोर्नोग्राफी अंतर्गत मुलांच्या संरक्षणासाठी पॉक्सो कायदा लागू करण्यात आला आहे. यात लहान मुलांचे फोटो, व्हिडिओ, डिजिटल किंवा संगणक-निर्मित प्रतिमा जी वास्तविक मुलांसारखी दिसत आहे, यांचा समावेश होतो.


 


 


सौ.लोकमत न्यूज


Previous Post Next Post