Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

23फेब्रूवारी होणार्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या बैठकीला लातूर जिल्हा माहिती अधिकारी श्री सुनिल सोनटक्के साहेब यांची प्रमुख उपस्थिती


सुनिल सोनटक्के-जिल्हामाहिती अधिकारी, लातूर


23फेब्रूवारी होणार्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या बैठकीला लातूर जिल्हा माहिती अधिकारी श्री सुनिल सोनटक्के साहेब यांची प्रमुख उपस्थिती


लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याची दि 23/फेब्रुवारी/2020 रोजी संयुक्त पत्रकार बैठक* 


 *संपादक व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,  महाराष्ट्र राज्य या संघटनेची लातूर  व उस्मानाबाद जिल्ह्याची संयुक्त मिटींग *रविवार दिनांक 23/ फेब्रुवारी/ 2020 रोजी सकाळी ठिक 11.00 वा शासकीय* *विश्रामगृह ( रेस्ट हाऊस) राजीव गांधी चौक, लातूर* येथे संस्थापक अध्यक्ष प्रा आंबेगावे डी. टी. यांच्या अध्यक्षतेखाली, लातूर जिल्हा माहिती अधिकारी श्री सुनिल सोनटक्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील संपादक व पत्रकारांच्या बैठकीचे  आयोजन करण्यात आले आहे. 
या बैठकीत पुढील मागण्यासह संपादक व पत्रकारांच्या उत्कर्ष व उन्नतीसाठी नियोजन करण्यात येणार आहे. 
 सरसकट साप्ताहिकांना शासकीय जाहिरात , विमा , आरोग्य,  मानधन , टोलमाफी, 1 लाख 44 हजार साप्ताहिकांना लावलेला दंड मागे घेणे, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक आरक्षण व उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती,  पत्रकारांसाठी गृह योजना, पत्रकारांना अधिस्विकृतीसाठी बातमी कात्रणे हा एकमेव पुरावा ग्राह्य धरावा, त्यासाठी शासनाने तातडीने अधिसूचना जारी करावी, 60 वर्षाच्या पुढील पत्रकारांना दरमहा 15,000 रू पेन्शन, मोफत प्रवास योजना,ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्रावर पत्रकारिता करणा-या पत्रकारांना संरक्षण, पत्रकारांवरील हल्याबाबत पोलिसांनी हल्लेखोरांवर दखलपात्र गुन्हे दाखल करावे , न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनलची शासन दरबारी नोंद करणे, न्यूज पोर्टलला शासकीय जाहिराती मिळवून देणे आदी मागण्या व संघटनेच्या पुढील ध्येय धोरणासंदर्भात व पत्रकारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात येणार आहे. 
तरी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील संपादक व पत्रकारांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या बैठकीसाठी वेळेवर उपस्थित राहावे. 


प्रा आंबेगावे डी. टी.
संस्थापक अध्यक्ष 
मो.9270559092  / 7499177411
श्री लक्ष्मण कांबळे 
राज्य उपाध्यक्ष  
मो.9307198726
श्री विष्णूभाऊ अष्टीकर 
मराठवाडा अध्यक्ष 
मो.9890958498 
श्री हुकूमत मुलाणी 
मराठवाडा कार्याध्यक्ष  
मो. 9623261000
श्री गोविंदराव निकम 
लातूर जिल्हाध्यक्ष 
मो.7517014776
श्री अनंत साखरे 
उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष
मो. 7822007043


Previous Post Next Post