Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पत्रकाराला धमकविणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल

 


पत्रकाराला धमकविणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल


वृत्त संकलनासाठी गेले असता दुकानदाराने केली दमदाटी


पेण/प्रतिनिधि/ मितेश जाधव


पेण तालुक्यातील वाकरूळ येथील एका किराणा मालाच्या दुकानदारानी पत्रकाराला धमकविल्या बाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


             पेण तालुक्यातील वाकृळ फाट्यावरील (प्रो प्रा विजय जयस्वाल) किराणा मालाच्या दुकानात सदर व्यक्ती खते व कीटकनाशके देखील विक्री करीत असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात स्थानिक नागरिकांनी दाखल केल्यानंतर त्याबाबत पत्रकार स्वप्नील पाटील, किरण बांधणकर आणि गणेश पाटील हे तिघे वृत्त संकलनासाठी गेले असता सदर तक्रारीप्रमाणे कीटकनाशके व किराणा माल एकाच ठिकाणी विकत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत सदर दुकानदाराला विचारणा केली असता त्याने माहिती देण्यास टाळाटाळ केली आणि तुम्ही विचारणारे कोण असे बोलून परत दुकानात आलेत तर बघून घेईन अशा प्रकारे दमदाटी केली. याबाबत सदर दुकानदार जयस्वाल याच्यावर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 124/2020 नुसार भा. दं. वि. कलम 506,504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


        सदर दुकानदारावर गुन्हा दाखल झाला असला तरी याबाबत अन्न व औषध कार्यालयासह कृषी विभागाने या दुकानदाराला परवाना कसे अदा केले आज जर अदा केले नसतील  तर तक्रारदाराने तक्रार दाखल करून देखील हा दुकानदार एकाच ठिकाणी किराणा माल व कीटकनाशके - खते कसा विकतो  तरी सुद्धा अन्न प्रशासन विभाग सह कृषी विभाग अशा दुकानदारांवर कारवाई का करत नाही असा  प्रश्न निर्माण झाला आहे


Previous Post Next Post