किल्ले मच्छिंद्र गड येथील अंगणवाडी १४९ची इमारत घाणीच्या विळख्यात ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
सांगली /प्रतिनिधि/ एकनाथ कांबळे
सांगली- किल्ले मच्छिंद्र गड येथील अंगणवाडी क्रमांक १४९ ची इमारत पुर्णपने घाणीच्या विळख्यात सापडलेली असून हि इमारत धोकादायक बनली आहे. गेली तिस ते चाळीस वर्षे या इमारतीला झालेली असून पावसाळ्यात या इमारतीत पाणी गळती होत आहे. त्या पावसाचे पाणी इकडे तिकडे ठिकाणी पसरू नये म्हणून भांडी ठेवावी लागत आहे !या इमारतीवरील पत्रा गंजलेल्या ( सडलेला) अवस्थेत आहे! अंगणवाडी च्या सभोवताली छोटि -छोटी झुडपे असून व त्या झुडपातून सरपटणारे प्राणी फिरताना ब-याच वेळा दिसून येताहेत आणि अंगणवाडी च्या इमारतीला घासूनच बौद्ध समाजाला शासनाकडून सार्वजनिक सौचालय बांधून दिलेले आहे त्या चे सांडपाणी जवळच सोडलेचे दिसून येते आहे त्यामुळे अंगणवाडी त शिकणा-या लहान लहान मुलांना दुर्गंधी स सामोरे जावे लागते आहे ! ब-याच वेळा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दुरूस्ती तथा स्वच्छता अभियान राबविण्यात यावे असे सांगून सुध्दा याकडे लक्ष दिले जात नाही ! यामुळे लहान मुलांचे आरोग्यास हानिकारक असे दुशित वातावरण निर्माण झाले आहे. तरी सदरच्या धोकादायक इमारती मधून अंगणवाडीसाठी दुसरी इमारत उपलब्ध करून देण्यात आली पाहिजे यासाठी ब-याच वेळा ग्रामपंचायत किल्ले मच्छिंद्र गड तथा महिला बाल कल्याण विभाग सांगली पदाधिकारी यांना सांगून सुध्दा याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पालक वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे! तरी याकडे प्रशासनाने त्वरीत लक्ष दिले पाहिजे असे मत स्थानिक पालकवर्गाचे आहे!