Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग २०२० प्रवेश प्रक्रिया सुुरु

 


ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग २०२० प्रवेश प्रक्रिया सुुरु





लातूर,दि.२८ःमहाराष्ट्र शासन, ग्रंथालय संचालनालयाच्या, जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघ लातूर संचलित ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग २०२० ची प्रवेश प्रक्रिया दि. ०१  मार्च  २०२० पासून  सुरु होत असून,ती दि १० मार्च २०२० पर्यंत चालणार आहे.
ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्गाच्या प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आवश्यक असून,या वर्गास प्रवेश गुणवत्तेनूसार दिला जातो,मान्यताप्राप्त सार्वजनिक ग्रंथालये,शाळा -महाविद्यालयांकडून  प्रतिनियुक्त असणार्‍या जिल्हयातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते, मात्र त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे.
अनुसूचीत जाती, जमाती, भटके विमुक्त,जाती,जमाती व इतर मागासवर्गीयाना शासन निर्णयानुसार प्रवेश दिला जाईल.त्यांनी
अर्जासोबत साक्षाकिंत केलेली दहावीचे गुणपत्रिका,प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे .
प्रवेश अर्ज व माहिती पत्रक जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संंघ, हुतात्मा स्मारक लातूर येथे  सकाळी ११ ते सायंकाळी  ५ या वेळेत उपलब्ध आहेत ,तरी विद्याथ्यार्ंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.  ब्रिजमोहन झंंवर, वर्ग व्यवस्थापक पांंडुरंग अडसुळे,कार्यवाह राम मेकले व पदाधिकार्‍यांनी  केले आहे.



 


Previous Post Next Post