Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर उमरगा रस्त्यावर विद्युत खांबांना वाहने धडकण्याची भीती... खांबा मुळे महामार्ग बनला मृत्यूचा सापळा... प्रशासनाला केव्हा येणार जाग...

 


लातूर उमरगा रस्त्यावर विद्युत खांबांना वाहने धडकण्याची भीती... खांबा मुळे महामार्ग बनला मृत्यूचा सापळा... प्रशासनाला केव्हा येणार जाग...


लातूर - उमरगा राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असताना सर्व नियम धाब्यावर बसवून हे काम पार पडले जात आहे. कारण काम सुरू करण्यापूर्वी या मार्गावरील महावितरणच्या खांबाची लाईन हटवून पर्याय निर्माण करणे क्रमप्राप्त होते. मात्र 
महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सबंधित कंत्राटदाराने याकडे सोईस्कर दुर्लक्ष केल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे.या संदर्भातील संपुर्ण माहिती फोटो क्राईम न्यूज च्या प्रतिनिधि नी घेतली. 
 लातूर-उमरगा महामार्गाचे लातूर ते उमरगा मार्गापर्यंतचे काम पुणे येथील एका बांधकाम कंपनीला देण्यात आले आहे. महामार्गालगत असलेल्या किल्लारी येथे हे काम सुरू आहे .त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने महावितरणची लाईन गेलेली आहे ही लाईन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केल्यानंतरच रस्त्याचे खोदकाम करणे आवश्यक होते पण संबंधित कंत्राटदारांनी लाइन स्थलांतरित न केल्याने वाहनधारकांना मोठा धोका निर्माण झाला आहे..सदर सुरू असलेले लाईन रस्त्यावर असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन यावर वाहने आदळण्याची धोका निर्माण झाला आहे नुसता खोदल्याने लाईन वरील अनेक काम पडण्याच्या स्थितीत आहेत लोकांच्या जीवाला धोका निर्माण होत असताना ही यंत्रणा गाफील आहे ...


दळणवळणाच्या दृष्टीने हा राष्ट्रीय महामार्ग महत्त्वाचा राहणार आहे. गेल्या दीड वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू असून वाहतुकदारांची मोठी गैरसोय होत आहे . असे असतानाही महावितरणच्या लाईनवर वाहने आदळून मोठा अनर्थ घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याकडे जाणीवपूर्वक होणारी बेफिकीरी जिवावर बेतल्यावरच यंत्रणेला जाग येणार का ? असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत ...


Previous Post Next Post