लातूर/ प्रतिनिधी
गेल्या सहा महिन्यापासून देसाई नगर येथील प्लॅटिनम फ्लॅट्स आमच्या समोरील रस्त्याचा वाद चालू असून 60 फुटाचा रस्त्यावर दोन व्यक्तीने अतिक्रमण केले असून त्या संदर्भात महापालिका आणि त्या व्यक्तीमध्ये वेळोवेळी चर्चा सुद्धा घडवण्यात आली आहे.महानगरपालीके मध्ये दोन वेळेस या संदर्भात सुनावनी होऊनही काहीच कार्यवाही झाली नाही.त्यामूळे आयुक्तांनी या गंभीर विषयावर लक्ष देण्याची गरज आहे.रस्त्यावर प्लॉटचे अतिक्रमण झाल्याने त्या भागातील नागरिकांना करण्यासाठी त्रास होत असून लहान मुले पत्र्याच्या शेड वर सोडून आत्तापर्यंत जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत, त्याचबरोबर रस्त्याच्या समोर काटे टाकून रस्ता बंद करण्याचा व रस्ते वर्गाचे टाकून विनाकारण नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न रस्त्याच्या बाजूला असलेल्या काही व्यक्तीकडून होत असून महानगरपालिकेने यासंदर्भात रस्त्यावरील काटे वेळोवेळी काढून नागरिकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न केला पण संबंधित व्यक्ती दुसऱ्या दिवशी ते काटे लगेच रोडवर टाकत असून जाणूनबुजून नागरिकांची अडवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे यासंदर्भात महानगरपालिका प्रशासन नगरसेवक यांनी ताबडतोब लक्ष घालून रस्त्याचा प्रश्न प्लॉट धारकाचा प्रश्न मिटवून प्रशासनाच्यावतीने रस्त्यावर काटे टाकून लोकांना त्रास देणाऱ्या व्यक्तीला जबर शिक्षा करावी.असे नाही केल्यास सोसायटीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली आहे. तरी माननीय महापौर साहेब महानगरपालिका प्रशासन आयुक्त साहेब जिल्हाधिकारी प्रसारमाध्यमांनी या प्रकरणात लक्ष घालून लोकांना योग्य तो न्याय द्यावा अशी अपेक्षा देसाई नगर येथील नागरिकांकडून व्यक्त होत आहे