Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

निधवली निफाड येथे भेकर जातीच्या वन्य प्राण्याची हत्या अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल

 


निधवली निफाड येथे भेकर जातीच्या वन्य प्राण्याची हत्या


अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल


पेण/प्रतिनिधि/ मितेश जाधव


पेण वन क्षेत्रपाल अधिकारी पी आय गायकवाड यांच्या आदेशानुसार निधवली निफाड येथील जंगलात गस्त घालत असणाऱ्या वनक्षेत्रपाल कर्मचाऱ्यांना भेकर (मादी)जातीचा वन्य प्राणी याची हत्त्या झाल्याचे आढळून आले.याबाबत सदर अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      याबाबत सविस्तर वृत्त असे की पेण तालुक्यातील पूर्व विभागातील निधवली निफाड जंगलात होळी सणानिमित्त वनक्षेत्रपाल अधिकारी पी आर गायकवाड यांच्या आदेशानुसार वनपाल ए एन काटकर व वनरक्षक एस ए चव्हाण हे निफाड येथील राखीव वन कपार्टमेंट नंबर 490 च्या लगत असणाऱ्या मालकी क्षेत्रात आले असता त्यांना एका भेकर जातीचा वन्य प्राणी मृत अवस्थेत आढळून आल्याने सदर वन्य प्राणी जप्त करून तसेच पंच समक्ष पंचनामा करून सदर प्राण्याचे पेण पशु वैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. यासंदर्भात माननीय सहाय्यक वनरक्षक अलिबाग यांच्या आदेशानुसार अज्ञात व्यक्तिविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर वन्य प्राणी 20 /2019 -2020 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर वन्य प्राण्याचे  वनकर्मचारी वसाहत आवारात पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ क्षीरसागर यांच्या समक्ष विल्हेवाट लावण्यात आली आहे.


Previous Post Next Post