Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मालमत्ता कराबाबत मनपाचे विशेष सर्वसाधारण सभा २० फेब्रुवारी रोजी. मालमत्ता करासह मनपा दुकान भाडे बद्दलही घेतला जाणार निर्णय.


मालमत्ता कराबाबत मनपाचे विशेष सर्वसाधारण सभा २० फेब्रुवारी रोजी

मालमत्ता करासह मनपा दुकान भाडे बद्दलही घेतला जाणार निर्णय.

 


 लातूर- लातूर शहर महानगरपालिके द्वारा आकारण्यात येत असलेल्या मालमत्ता कराबाबत विचारविनिमय करून निर्णय घेण्याबाबत महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा दिनांक २० फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या वतीने मालमत्तांचे पूनसर्वेक्षण करून मालमत्ता कराची आकारणी करण्यात आलेली होती परंतु याबाबत नागरिकांमधून सातत्याने तक्रारीचा सूर जाणवत होता. याचबरोबर मनपा मालकीच्या दुकान भाडे वाढी बद्दलही भाडेकरुंकडून प्रतिसाद मिळत नाही.

  पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनीही मनपा पदाधिकाऱ्यांना नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन लवकरात लवकर मालमत्ता कर व दुकान भाडे बाबत आवश्यक निर्णय घेण्याच्या सूचना केल्या होत्या. 

 

महानगरपालिके द्वारा आकारण्यात आलेल्या मालमत्ता कराबाबत माननीय उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी अंती उच्च न्यायालय यांनी कलम 99 अन्वये निर्णय घेण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. या अनुषंगाने दिनांक ११/७/२०१९  रोजी स्थायी समितीने यापूर्वीच निर्धारित केलेल्या आहे त्याच दरांना मंजुरी दिलेली आहे.

  शहराची विभागणी एकूण ९ विविध झोन मध्ये करण्यात येऊन तेथील मालमत्तांना भाडे मूल्याधारित मालमत्ता कर आकारणी करण्यात आलेली आहे. सन २००९ साली तत्कालीन नगरपरिषदेने निश्चित केलेले २६ टक्के दराने या मालमत्ता कराचे आकारणी करण्यात आलेली आहे. पुनरसर्वेक्षण केल्यानंतर महानगरपालिकेची वार्षिक डिमांड सुमारे ४३ कोटी इतकी झालेली आहे. परंतु महानगरपालिकेस कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी दरवर्षी सुमारे ३३ कोटी रुपये व वीज बिल व अत्यावश्यक सेवांसाठी २४ कोटी रुपये एवढ्या खर्चाचा बोजा आहे.

अशा परिस्थितीत हे नागरिकांना आकारण्यात आलेल्या कराल बाबत नागरिकांमधून सातत्याने नाराजी दिसून येत आहे याचा परिणाम कर वसुलीवर होत असल्याने लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत नागरिकांच्या तक्रारीचा सकारात्मक विचार करून निर्णय घेण्यात येणार आहे.

मनपा मालकीच्या गाळे भाडे बद्दल दिनांक ७/९/२०१८ रोजी सर्वसाधारण सभेने रेडीरेकनर दराने भाडे आकारण्यास दिलेल्या मान्यतेनुसार गंजगोलाई येथील दुकानांना ३ लक्ष अनामत रक्कम तर ९८७५, गांधी मैदान येथील गाळे ८५४७, गांधी मार्केट ८४००, मिनी मार्केट ६५९० प्रतिमाह भाडे घेण्यास मंजुरी दिलेली आहे याबाबतही गाळेधारकांनी अनास्था दाखविल्याने अद्याप या भाड्याची वसुली झालेली नाही मनपा दुकान गाळे भाडे संदर्भातही दिनांक २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे एकूणच लातूरकरांचा जिव्हाळ्याच्या दोन्ही विषयावर या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार हे. 

 

 

लातुरकरांकरिता हितकारक निर्णय घेणार - मनपा पदाधिकारी

लातूर शहरातील मालमत्तांना करण्यात आलेल्या मालमत्ता कराबाबत व मनपा दुकान गाड्या भाडे वाढीबाबत नागरिकांच्या तक्रारी असून पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी यावर सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना केलेल्या असून लातूरकरांना रास्त कर आकारणी सह महानगरपालिका विकास कामे राबविण्यास सक्षम राहील असाच निर्णय सर्व सदस्यांच्या सूचना स्वीकारून घेण्यात येणार असल्याचे माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार व विरोधी पक्षनेते दीपक सूळ यांनी दिली.

 

 

 

५ महिन्यापूर्वी स्थायी समितीने यापूर्वीच आकारण्यात आलेल्या दरांना दिली होती मंजुरी.

माननीय उच्च न्यायालय यांनी कलम 99 निर्णय घेण्याच्या सूचना दिलेल्या होत्या या अनुषंगाने दिनांक ११/७/२०१९  रोजी स्थायी समितीने यापूर्वीच निर्धारित केलेल्या आहे त्याच दरांना मंजुरी दिलेली आहे.


 

पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी रेडीरेकनर नुसार मनपाच्या गाड्यांना भाडे आकारण्याचा केला होता निर्णय.

यापूर्वी रेडीरेकनर दराने भाडे आकारण्यास दिलेल्या मान्यतेनुसार गंजगोलाई येथील दुकानांना ३ लक्ष अनामत रक्कम तर ९८७५, गांधी मैदान येथील गाळे ८५४७, गांधी मार्केट ८४००, मिनी मार्केट ६५९० प्रतिमाह भाडे घेण्यास मंजुरी दिलेली आहे. याबाबतही या सभेत महत्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे.

 

सर्व पक्षीय सदस्यांनी सहकार्य करण्याचे जेष्ठ सदस्यांचे आवाहन.

मत्ता करत योग्य आकारणी व्हावी हे लातूरकरांची मागणी असून याबाबत सर्वसहमती बनविण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य अशोक गोविंदपूरकर, रवीशंकर जाधव, अहमद खान पठाण सपना किसवे, पूजा पंचाक्षरी, कैलास कांबळे, पप्पू देशमुख प्रयत्न करीत असून सर्वपक्षीय सदस्यांनी याकरिता सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले


Previous Post Next Post