करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा सज्ज
लातूर- करोना या विषाणूमुळे न्युमोनिया सारखी लक्षणे असलेला आजार असून करोना बाधित क्षेत्रातून येणाऱ्या प्रवाशांमध्ये अथवा करोना विषाणू रुग्णांच्या संपर्कात आल्यास आजाराची शक्यता उद्भवू शकते, संसर्गाची लक्षणे- खोकला, ताप, श्वासोश्वासास त्रास सर्व साधारपणे हा आजार हा हवेवाटे, शिंकण्यातून , खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून पसरतो. हा आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हापरिषद आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे.
या आजारावर मात करण्यासाठी जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांना राज्यस्तरावरुन आलेल्या मार्गदर्शक सूचना देण्यात आलेले आहेत. तसेच गाव पातळीवर या संदर्भात जनतेनी काय काळजी घ्यावी या संदर्भात हस्तपत्रके , पोस्टर, बॅनर्स ई. व्दारे माहिती देण्यात येत आहे. आरोग्य कर्मचारी यांच्या व्दारे सर्दी, ताप ,खोकला अशा रुग्णांचे रोग सर्वेक्षण करण्यात येत आहेत.
जिल्हास्तरावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे करोनासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्षाची (Isolation Ward) स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागातील एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाचे सर्वेक्षण अधिकारी या कक्षास दिवसातून दोन वेळेस भेट देऊन त्याबाबतचा अहवाल घेत आहेत. जनतेने घाबरुन न जाता सावध रहावे बाधित भागातून आलेल्या प्रवाशांची माहिती आरोग्य यंत्रणेला द्यावी व नजीकच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जी.जी. परगे यांनी केले आहे.
खबरदारीची उपाय योजना :-
1.शिंकताना व खोकलताना आपल्या नाकावर रुमाल धरावा. 2. साबण व पाणी वापरुन आपले हात स्वच्छ धुवातेत, 3. सर्दी किंवा फ्ल्यू सदृश्य लक्षणे असलेल्या लोकांशी नजीकचा संपर्क टाळावा, 4. मांस व अंडी पूर्णपणे शिजवून व उकडून घ्यावेत, 5. जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकट संपर्क टाळावा.