लातूर मध्ये त्या तरुणीचा चेहरा जाळला नसून,स्टोच्या भडक्याने जळाला.
लातूर/ प्रतिनिधी- औरंगाबाद नंतर लातुरात देखील 18 वर्षीय तरुणिचा चेहरा जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असल्याची बातमी वार्यासारखी लातूर मध्ये पसरली होती,त्याबद्दल ची संपुर्ण माहिती फोटो क्राईम न्यूज च्या प्रतिनिधि नी घेतली.
लातूर शहरातील दीपज्योति नगर भागात राहणाऱ्या 18 वर्षीय तरुणीच्या चेहऱ्यावर रॉकेल टाकून जाळण्यात आले ! त्यात तरुणिचा चेहरा 15 % भाजला असून तिला लातुरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे ! आशा प्रकारची बातमी एका पेपर ने प्रकाशित केली होती, परंतु याबाबत फोटो क्राईम न्यूज च्या संपादकांनी लातूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक राजेंद्र माने यांना फोन करून विचारले असता,त्या तरुणीचा चेहरा जाळला नसून,स्टोच्या भडक्याने जळाला असल्याचे प्रथम दर्शनीय तपासात निशपन्न झाल्याचे सांगीतले,तसेच त्या मुलीच्या नातेवायीकाची कसलीही तक्रार नसल्याचे त्यांनी नमुद केले.