किल्लारी परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट....
किल्लारी/प्रतिनिधि
किल्लारी- परिसरात किल्लारी पाटीवर व गावांत वेशीपासून 500मिटर अंतरावर 5ते6 बोगस डॉक्टरांनी आपले बस्तान मांडले असून दिवसाढवळया पेशंटच्या जिवाशी खेळत आहेत, विशेष म्हणजे या बोगस डॉक्टरांकडे कसल्याही प्रकारची वैद्यकीय प्रमाणपत्र नाही,पेशंटची तपासणी करण्यासाठी म्हणून 50रू फिस आकारतात व त्याच ठिकाणी पेशंटला सलाईन लावून त्यांच्या जिवाशी खेळ करतात.प्रशाशन मात्र मुग गिळून गप्प बसले आहे.अधिकारी हप्त्याच्या लालसेपोटी कार्यवाही करत नसल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.आशा गंभीर प्रकरणाकडे वरिष्ठ अधिकारी काय कार्यवाही करणार याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Tags:
LATUR