वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक हस्तलिखित पुस्तक प्रकाशन सोहळा
सांगली/ प्रतिनिधी/ एकनाथ कांबळे
छत्रपती संभाजी विद्यालय,शिवनगर(किल्ले मच्छिंद्र गड)या विद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक हस्तलिखित पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला यावेळी उपस्थित माण्यवर मा.बाळासाहेब निकम शिक्षणसंस्था संचालक व पंचायत समिती सदस्य कराड यांच्या हस्ते *कै.जयवंतरावजी भोसले (आप्पा) यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करणेत आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.सौ,स्मिता मोहिते मॅडम व मा.अस्लम मुल्ला सर यांनी केले यावेळी इयत्ता पाचवी ते नववी पर्यंत च्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले लहान मुलांना संगित कला क्षेत्रात आनंद घेता आला पाहिजे व आनंदी व उत्साही वातावरणात निर्माण झाले पाहिजे व विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दल ओढ निर्माण झाली पाहिजे व आपले जीवन आनंदमय सुखमय होईल असे वातावरण निर्माण करण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे असे मत शाळेचे मुख्याध्यापक मा.सावंत सर व मा.श्रिमती व्यास मॅडम व इतर शिक्षक स्टाप यांच्या पुढाकाराने हे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते यावेळी इयत्ता नववी मधील विद्यार्थ्यांनी.कै.जयवंतरावजी भोसले आप्पा यांच्या जीवनावर एक सुंदर असे पुस्तक लिहिले आहे त्याची प्रत वरिष्ठ पदाधिकारी यांना भेट देण्यात आली !
कार्यक्रमाची सांगता झाली असता विद्यार्थी व शिक्षक स्टाप यांच्या वतीने एका गोड गिताच्या तालावर मणसोक्त डान्स करण्यात आला व आनंद घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी उपस्थित माण्यवर मंडळीच्या हस्ते उपस्थित पालक व माता यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले आभार मा.दमामे सर व विकास लाहिगडे सर यांनी मानले?