लातूर जिल्हा बँकेच्या बोरगांव (काळे )येथील शाखेचा नुतन इमारतीचा गुरुवारी
सहकार महर्षी दिलीपराव देशमुख ,यांच्या अध्यक्षतेखाली आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ
लातूर/प्रतिनिधि,
महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात आव्वल स्थानी असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्य लातूर तालुक्यातील बोरगांव काळे शाखेच्या नुतन इमारतीचा उद्घाटन सोहळा राज्याचे माजी मंत्री सहकारी महर्षि दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता बोरगांव काळे येथे आयोजित करण्यात आला असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख,विलास साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक नाथसींह देशमुख यांची उपस्तीति राहणार आहेत अशी माहिती लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे यानी दिली
लातूर तालुक्यातील बोरगांव काळे येथील बँकेची इमारत प्रशस्त बांधण्यात आली असून अत्याधुनिंक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन बैंकिंग व्यवहार संगणक प्रणालीत सुरु केले करण्यात आले असून ग्राहकांना अधिकाधींक सोयी सुविधा उपलब्ध देण्यासाठी बैंकेचा प्रयत्न केला आहे
विलास साखर कारखाना संचालक मंडळाचा जिल्हा बँकेच्या वतीने होणार सत्कार
बोरगांव काळे येथील इमारत शुभार्ंभ सोहळ्यात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या वतीने विलास साखर कारखान्याचे बिनविरोध निवडून आलेले सर्व संचालक मंडळ यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या प्रशस्त अत्याधुनिंक इमारतीचा शुभारंभ कार्यक्रमास शेतकरी सभासद. ग्राहक.हीतचिंतक यानी उपस्तीत राहावे असे आवाहन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे व्हाईस चेअरमन पृथ्वीराज सिरसाठ कार्यकारी संचालक हनमंत जाधव सन्माननीय संचालक मंडळ यानी केले आहे.