आमदार धिरज देशमुख यांच्या प्रयत्नामुळे
अनेक वर्षांपासून रखडलेल्या गुंंफावाडी रस्त्याचे मजबुतीकरण
लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील गुंफावाडी ते गुंफावाडी शिवपर्यंतचा डांबरी रस्ता पुर्णत: उखडला होता. या रस्त्याची चाळणी झाली होती. हा रस्ता दुरुस्त करावा, या मागणीचे निवेदन गावातील हनुमंत फेरे यांनी दि. २० जानेवारी २०२० रोजी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलसराव देशमुख यांना दिले होते. त्या निवेदनाची दखल घेत आमदार देशमुख यांनी संबंधित विभागाला सूचना केल्या. त्यानंतर त्या रस्त्याच्या मजबुतीकरणाला सुरुवात झाली आहे.
गुंफावाडी ते गुंफावाडी शिवपर्यंतचा डांबरी रस्ता लातूर-उस्मानाबाद जिल्ह्याला जोडलेला असल्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. परंतू या रस्त्याच्या मजबुतीकरणाकडे सतत दूर्लक्ष होत राहिले. या रस्त्याचे मजबुतीकरण व्हावे, या मागणीचे निवेदन हनुमंत फेरे यांनी आमदार धिरज विलासराव देशमुख यांना दिले. या निवेदनाची दखल घेत आमदार देशमुख यांनी संबंधित अधिका-यांना तातडीने या रस्त्याचे मजबुतीकरण करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम सुरु झाले आहे. याबद्दल येथील व परिसरातील ग्रामस्थांनी आमदार धिरज विलासराव देशमुख यांचे आभार मानले आहे.
Tags:
LATUR