Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

भाजपाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तहसिल समोर आज धरणे आंदोलन बहुसंख्येनी सहभागी व्हावे भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेशअपा कराड यांचे अवाहन

 


भाजपाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तहसिल समोर धरणे आंदोलन


आज धरणे आंदोलन बहुसंख्येनी सहभागी व्हावे


 भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेशअपा कराड यांचे अवाहन


लातूरराज्यातील महाविकास आघाडी शासनाने भाजपा सरकारच्या काळात घेतलेल्या अनेक जनहिताच्या निर्णयांना स्थगीतीदेत शेतकर्‍यांची फसवणूक केली असून महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. याचा निषेध करण्यासाठी माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टी तर्फे मंगळवार , दि.२५ फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या अंदोलनात त्या त्या तालूक्यातील भाजपाच्या सर्व पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनीधी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनी सहभागी व्हावे असे अवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड यांनी केले आहे.


            भाजपाचा विश्वासघात करुन काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकर्‍यांचा विश्वासघात केला आहे. विद्यमान मुख्यमंत्री तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळ बागांसाठी ५० हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. सरसकट कर्ज माफी करु, सातबारा कोरा करु अशा घोषणा करणार्‍या आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही. शेतकर्‍यांची फक्त अल्प मुदतीची पीक कर्जे माफ करण्याची घोषणा केली त्यामूळे बहुसंख्य शेतकर्‍यांना या कर्ज माफीचा फायदा मिळणार नाही. दोन लाखांवर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमीत परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांबाबत महाविकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेत कसलाच उल्लेख नाही. भाजपा सरकारच्या कर्ज माफीत पीक कर्ज तसेच मध्यम मुदतीचे कर्ज समाविष्ट केल्याने पॉलीहाऊस, शेडनेट, शेती उपकरणं, पशुपालन, शेळीपालन, मधमाशीपालन अशा सर्व प्रकारच्या शेतकर्‍यांना लाभ मिळाला होता. भाजपा सरकारच्या व्यापक कर्ज माफीमूळे ४३ लाख शेतकरी खातेधारकांना १९ हजार कोटींचा लाभ देण्यात आला. तुर खरेदीचे निकष महाविकास आघाडी सरकारने बदलल्यामूळे शेतकर्‍यांकडून होणार्‍या खरेदीचे प्रमाण खूप कमी झाले आहे. शेतकर्‍यांची घोर फसवणूक करणार्‍या महाविकास आघाडी सरकाचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करत आहे.


            गेल्या महिन्याभरात राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेलेला आहे. अ‍ॅसिडहल्ला, अल्पवयीन मुलींवर आत्याचार, बलात्कार, महिलांना जाळून टाकणे अशा घटना वाढू लागल्यामूळे महिला व तरुण मुलींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या आणि शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध करण्यासाठी २५ फेब्रुवारी २०२० मंगळवार रोजी माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात  जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तेंव्हा त्या त्या तालूक्यातील भाजपाच्या सर्व पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, शेतकरी, महिलासह सर्व स्थरातील जनतेनी तहसील समोर होणार्‍या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असेही अवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड यांनी केले आहे.


जिल्यातील या आंदोलनाचे विधानसभा निहाय नेतृत्व लातूर ग्रामीण – रमेशअप्पा कराड, खा. सुधाकर शृंगारे, शिवाजीराव पाटील कव्हेकर, निलंगा – माजी खा. रुपाताई पाटील निलंगेकर, अरविंद पाटील, दगडुसाहेब साळुंके, संजय दोरवे, बाळासाहेब शिंगाडे, उदगीर – गोविंदअण्णा केंद्रे, सुधाकर भालेराव, नागनाथ निडवदे, राहुल केंद्रे, अनिल कांबळे, रामचंद्र तिरुके, बस्वराज बागबंदे, औसा – आ. अभिमन्यु पवार, मुक्तेश्वर वागदरे, सुभाष जाधव,  अहमदपूर – गणेशदादा हाके, विनायकराव पाटील, बब्रुवान खंदाडे, प्रकाश देशमुख, अशोक केंद्रे, रोहिदास वाघमारे आदी करणार आहेत.


Previous Post Next Post