Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूरच्या क्रिकेट संघाची नांदेड वर मात ,विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेस उत्साहात सुरुवात

 



लातूरच्या क्रिकेट संघाची नांदेड वर 3 गड्यांनी मात ,विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेस उत्साहात सुरुवात


लातूर, दि 7:- विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत आज झालेल्या पहिल्या क्रिकेट सामन्यात लातूरच्या क्रिकेट संघाने नांदेड क्रिकेट संघावर अत्यंत अटीतटीच्या सामन्यात तीन गडी ठेवून विजय मिळविला. या सामन्यात लातूरचे जिल्हाधिकारी तथा लातूर क्रिकेट संघाचे कर्णधार जी श्रीकांत यांनी अष्टपैलू कामगिरी बजावून लातूरच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.


दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित लातूर विरुद्ध नांदेड क्रिकेट सामन्यात नांदेड संघाने प्रथम फलंदाजी करताना बारा षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात 86 धावा फटकावल्या तर नांदेड संघाकडून फलंदाज श्री रोडे व श्रीकांत यांनी प्रत्येकी 18 व 16 धावांचे योगदान दिले इतर फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही तर लातूर क्रिकेट संघाचं गोलंदाज विलास मलीशे, श्री स्वामी, सुनील शेळके व कर्णधार श्रीकांत यांनी प्रत्येकी  नांदेड संघाचा एक गडी बाद केला.


लातूर क्रिकेट संघा कडून स्वप्निल पवार(11), अडसूळ- 14,  तर कर्णधार जी श्रीकांत-34 यांनी चांगली फलंदाजी करून लातूर क्रिकेट संघाला विजयी केले. लातूरचे जिल्हाधिकारी तथा क्रिकेट संघाचे कर्णधार श्रीकांत यांनी 26 चेंडूत 34 धावा पटकावून लातूरच्या संघाला सहा चेंडू  व तीन गडी ठेवून विजय मिळवून दिला. लातूर क्रिकेट संघाने 11 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 87 धावा फटकावल्या तर याच मैदानावर झालेल्या दुसऱ्या क्रिकेट सामन्यात बीड क्रिकेट संघाने औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघावर विजय प्राप्त केला.


बॅडमिंटन:-


बॅडमिंटन क्रीडाप्रकारात 45 वर्षावरील उस्मानाबाद पुरुष संघाने बीड पुरुष संघावर तर परभणी संघाने हिंगोली संघावर विजय मिळविला. त्याप्रमाणेच पंचेचाळीस वर्षावरील लातूरच्या बॅडमिंटन महिला संघाने बीडच्या संघावर तर नांदेडच्या महिला संघाने उस्मानाबादच्या संघावर मात केली.


कॅरम:-


कॅरम पुरुष क्रीडाप्रकारात नांदेड उस्मानाबाद हिंगोली परभणी या पुरुष एकेरी संघाने प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवला.


बुद्धिबळ:-


 बुद्धिबळ पुरुष स्पर्धेत परभणी, उस्मानाबाद, बीड व औरंगाबाद संघाने प्रतिस्पर्धी संघावर मात केली.


हॉलीबॉल:-


 लातूर विरुद्ध परभणी संघातील हॉलीबॉल सामन्यात लातूर जिल्हा संघाने विजय मिळविला.


बॅडमिंटन( दुहेरी):-


45 वर्षावरील दुहेरी पुरुष बॅडमिंटन स्पर्धेत नांदेड व जालना संघ विजयी तर महिला दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत नांदेड, हिंगोली व औरंगाबाद संघ विजयी झालेले आहेत. त्याप्रमाणेच बॅडमिंटन महिला एकेरी मध्ये नांदेड, बीड व लातूर संघ विजयी झाले असून बॅडमिंटन पुरुष एकेरी मध्ये परभणी, जालना व उस्मानाबाद संघ विजयी झालेले आहेत.



Previous Post Next Post