तपसे चिंचोली पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर महिलांचा मोर्चा राजकीय दबावाखाली अधिकारी काम करत असल्याचा जनतेचा दावा
औसा प्रतिनिधी:-
औसा तालुक्यातील तपसे चिंचोली गावात ग्रामपंचायतच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला असून गावातील टाक्यांना वेळेवर पाणीपुरवठा केला जात नसल्याने ग्रामपंचायत विरोधात ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.गावातील कोणतीही समस्या आली त्याचे निरसन करण्यासाठी अधिकारी वर्गाकडून प्रचंड टाळाटाळ केली जाते. राजकीय दबावाखाली अधिकारी काम करत असल्याचा नागरीकांकडून बोलले जात आहे.संतप्त झालेल्या वार्ड क्रमांक चार मधील महिलांनी बूधवार दि.18 फेब्रूवारी ग्रामपंचायत वर घागरी घेऊन मोर्चा वळवला होता.
यावेळी संगीता पळसे , वनिता येरणुळे,बबीता गरड,धोंडाबाई बलसुरे,द्रोपती येरनुळे, राजाबाई येरनुळे,भामाबाई येरनुळे, शारदाबाई तेलंग,पदमीनबाई पळसे,सविताबाई पळसे,जरिनाबी सय्यद,झाकिराबी पठाण, फातिमा पठाण,उशाबाई पळसे, राजाबाई पळसे,मंगलबाई पळसे, केशरबाई येरनुळे,भागाबाई पळसे,शालुबाई येरनुळे,कालिंदाबाई येरनुळे, सुमनबाई गरड आदी महिला उपस्थित होत्या. संबंधित पाणीप्रश्नासाठी ग्रामविकास अधिकारी जोशी यांच्याशी संपर्क साधला असता खूप वेळ संपर्क होऊ शकला नाही .संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील नागरिक यांनी "येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी ग्रामपंचायत कडून योग्य ते प्रयत्न केले जातील" आश्वासनावर महिलांनी मोर्चा माघार घेतली.संतप्त मोर्चेकऱ्यांनी माघार घेतल्यानंतर ग्रामविकास अधिकारी जोशी ग्रामपंचायत कार्यालयात ला हजर झाले. ग्रामस्थांच्या अडीअडचणी जर ग्रामविकास अधिकारी यांना सोडवणं शक्य नसेल तर अशा अधिकाऱ्यांचा काय उपयोग ? असा प्रश्न संतप्त ग्रामस्थ आणि महिलांच्या वतीने विचारला जात आहे.
आता ग्रामसेवक या झालेल्या मोर्चा बद्दल काय भूमिका घेतील ? गावातील पाणीपुरवठा सुरळीत होईल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.