Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

नवोदित लेखकांना संधी देणं गरजेचे..!

 


नवोदित लेखकांना संधी देणं गरजेचे..!


आपण नेहमीच बघत आलेलो आहे की,आपल्या सभोवतालचे काही संकटात सापडलेले लोक कुणाचा न कुणाचा तरी चांगला सल्ला व मार्गदर्शन मिळावे म्हणून सल्ला घेत असतो आणि त्या व्यक्तीला समोरची व्यक्ती योग्य असे मार्गदर्शन करते.परंतु काही वेळाने ती संकटात असलेली व्यक्ती त्या समोरच्या व्यक्तीने केलेले मार्गदर्शन याकडे दुर्लक्ष करते.मग या दोघांच्या आपआपसांतील बोलण्याने त्या समोरच्या व्यक्तीचा वेळ खर्च झालेला असतो.म्हणजे वेळ ही अमूल्य आहे,आपण सर्वांनी या वेळेचा दुरुपयोग न करता सदुपयोग करायलाच हवा..? मग या सदुपयोगानेच आपला वेळ वाचून जीवनाचे सार्थक होईल.मग यासाठी सर्वांनी एक नवीन नियम बनवायला हवा;तो म्हणजे ज्याच्याकडून आपण ज्ञान घेणार आहोत त्या ज्ञान देणाऱ्या व्यक्तीने बक्षिस स्वरूपात मोबदला घ्यायलाच हवा...!म्हणजेच जो व्यक्ती संकटात सापडलेल्या व्यक्तींना मार्गदर्शन करत असतो त्यानी केलेल्या मार्गदर्शनाकडे संकटात सापडलेला व्यक्ती दुर्लक्ष करणारच नाही....?मग जगात कुणीच कुणाचा वेळ वाया घालणार नाही आणि अवास्तव बडबड करणाऱ्या व्यक्तीची बडबड नक्कीच थांबेल..? आणि कुठेही जरी कुणी भेटले तर पुस्तक (साहित्य)वाचन संस्कृती पुन्हा नव्याने उदयास येईल.मग संकटात सापडलेला व्यक्ती पुस्तकात ज्ञान शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करील..!आणि पुन्हा एकदा नवंनवीन लेखकांचा उदय होईल आणि आपल्या जगाला नवनवीन साहित्यरुपी अमृत प्राप्त होईल.


लेखक:योगेश तुळशीराम मोरे,
मराठी साहित्यिक तथा प्रसिद्ध व्याख्याते औरंगाबाद.
मो.क्र.7972215568


Previous Post Next Post