माहिती उपसंचालक यशवंत भंडारे यांना पत्रकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन
लातूर/प्रतिनिधि -महाराष्ट्र पत्रकार संघाच्या माध्यमातून साप्ताहिक व दैनिक वृतपत्राच्या अडीअडचणी तसेच पत्रकारांसाठी विविध मागण्यांचे निवेदन लातूर येथील विभागीय माहिती उपसंचालक यशवंत भंडारे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले.
या निवेदनामध्ये पत्रकारांना जाहिरात , विमा , आरोग्य, मानधन , टोलमाफी, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक आरक्षण व उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, पत्रकारांसाठी गृह योजना आदी महत्त्वपूर्ण विषय या निवेदनात मांडण्यात आले आहेत. हे निवेदन देताना महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल तगलपल्लेवार, साप्ताहिक संघाचे अध्यक्ष रविकिरण सूर्यवंशी, उपाध्यक्ष वामन अंकुश, सचिव दत्तात्रय परळकर , किशोर जाधव, सागर वाघमारे, उदय दाभाडे , अंबादास करकरे , विष्णू कळसे, गोविंद बरुरे, चंद्रकांत लवटे, लिंबराज पन्हाळकर, विष्णू अष्टीकर , ओम पेन्सलवार, अजित देवकते, सुभाष गोळे, शिवानंद पाटील , मुरलीधर चेंगटे, गणपती राठोड, महेश पाळणे, संदीप सूर्यवंशी , भारत जाधव आदींची उपस्थिती होती.