Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

ग्लोबल फाउंडेशनची बुधवारी एफपीओ, शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवड कार्यशाळा

 


ग्लोबल फाउंडेशनची बुधवारी एफपीओ,

शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवड कार्यशाळा






शेतकरी उत्पादक कंपन्यांना नवीन संधी

लातूर, ता. २४ (प्रतिनिधी) ः ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे (एफपीओ) संचालक व प्रगतिशील शेतकऱ्यांसाठी बुधवारी (ता. २६) येथील चितीकिरण हाॅटेलच्या फंक्शन हाॅलमध्ये फळबाग लागवड कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. मराठवाड्यातील दुष्काळी भागात शेतकऱ्यांना फळबाग लागवडीतून अधिक उत्पादन व उत्पन्न मिळवून देण्य़ासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

ग्लोबल फाउंडेशनच्या पुढाकाराने बुधवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोरील हाॅटेल चितिकिरण फंक्शन हाॅलमध्ये लातूर जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक व प्रगतिशील शेतकरी यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्लोबल फाउंडेशनचे प्रमुख व ज्येष्ठ समाजसेवक मयंक गांधी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. निवृत्त कृषी अधिकारी तथा मार्गदर्शक रमेश चिल्ले, ज्येष्ठ पत्रकार अरविंद रेड्डी, प्रकल्प प्रमुख भैरवी गावडे, अतुल कदम यांची उपस्थिती राहणार आहे. 

ग्लोबल फाउंडेशनचे प्रमुख मयंक गांधी यांच्या संकल्पनेतून बीड जिल्ह्यात ग्लोबल परळी नावाने प्रकल्प राबविला जात आहे. यात आरोग्य, शिक्षण, जलसंधारण व फळबाग लागवडीची कामे केली जातात. पाण्याच्या उपलब्धतेनुसार आंबा, डाळिंब, पेरू, सीताफळ, संत्रा, मोसंबी, केळी, पपई, शेवगा व तुती (रेशिम) लागवडीस प्रोत्साहन दिले जाते. साधारणतः दहा प्रकारच्या फळपिकां लागवड व संगोपनासाठी शेतकऱय़ांना मदत व मार्गदर्शन केले जाते. शासकीय योेजनांची माहिती देऊन लाभ घेण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन केले जाते.  त्यासोबत शेतकऱ्यांना लागवड़ीचे आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रीय खतांचा वापर व फळांच्या विक्रीसाठी (मार्केट लिंकेजेस) मदत केली जाते. या प्रकल्पाद्वारे परळी, माजलगाव, आंबाजोगाईच्या  दुष्काळी व मागासलेल्या भागातील शेतकऱ्यांनी उन्नती साधत स्वकष्टाने विकास साधला आहे. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. याच स्वरूपाचा प्रकल्प बीडसह, उस्मानाबाद, परभणी व लातूर जिल्ह्यात राबविण्याचा संकल्प ग्लोबल फाउंडेशनने केला आहे.

लातूर येथील कार्यशाळेत फळबाग लागवड करू इच्छिणारे शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांच्याशी विचारविमर्श केला जाणार आहे. फळबाग लागवड व मार्केट लिंकेजेस मिळविण्यातील शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटांची भूमिका यावर मार्गदर्शन होणार आहे. फळबाग लागवडीसाठी उत्सुक असलेले शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालकांनी या कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन ग्लोबल फउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.




 



Previous Post Next Post