पोलिस स्टेशन बिडकीन येथील नुतनीकरण व सुशोभीकरणाच्या उपक्रमांचे पोलिस अधिक्षक श्रीमती मोक्षदा पाटिल यांच्या शुभ हस्ते लोकार्पण
प्रतिनिधी/औरंगाबाद/रवि गायकवाड
बिडकीन(प्रतिनिधी) :नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी दक्ष,जलयुक्त,क्लिन व ग्रीन बिडकीन पोलिस स्टेशनचे पोलिस अधिक्षक यांचे कडुन कौतुक आज दि.२५ रोजी सकाळी ११ वाजता औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक श्रीमती मोक्षदा पाटिल यांनी पोलिस स्टेशन बिडकीन येथे भेट देवुन लोकोपयोगी उपक्रमाचे,नुतनीकरण व सुशोभीकरणाच्या कामाचे लोकार्पण केले.यावेळी पैठण उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधिक्षक गोरख भामरे,पोलिस स्टेशन बिडकीन प्रभारी अधिकारी राजेंद्र बनसोडे तसेच सहकारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.दैनंदिन कामानिमीत्त पोलिस स्टेशन बिडकीन येथे येणारे नागरिक तसेच राञंदिवस कर्तव्यावर असणारे पोलिस कर्मचारी यांचेसाठी पायाभुत सोयी सुविधांसोबत स्वच्छ व आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत मा.पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटिल यांनी माहे सप्टेंबर २०१९ मध्ये वार्षिक तपासणी दरम्यान पोलिस स्टेशन बिडकीन येथे भेट दिली असता सुचित केले होते.मा.पोलिस अधिक्षक यांचे सुचनेनुसार पोलिस स्टेशन बिडकीन ने पुढाकार घेत पोलिस ठाणे परिसरात वृक्षांरोपण,प्रागणात आसनव्यवस्था,पिण्याचे शुद्ध पाणी,शौचालय निर्मीती,वाहनतळाची व्यवस्था,जलपुनर्भरण,अभ्यागत कक्ष,खेळाचे मैदान,इत्यादी उपक्रम राबविले आहेत.यापैकी काही उपक्रम स्वखर्च व श्रमदानातुन तसेच काही उपक्रम स्वेच्छा लोकसहभाग व सामाजिक दांयित्त्व निधीमधुन राबविलेले आहेत.सदर उपक्रमाचे लोकार्पण करताना मा.मोक्षदा पाटिल यांनी पोलिस स्टेशन बिडकीन येथील अधिकारी व कर्मचारी यांचे मनापासून कौतुक केले.तसेच पोलिस स्टेशनच्या परिसराचे स्वरुप ज्याप्रमाणे बदलविले आहे त्याचप्रमाणे नागरिकांसाठी पोलिस व पोलिसींगाचे स्वरुप देखील अंतर्बाह्य बदलवुन अधिकाधीक लोकाभिमुख पोलिसींग करण्याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी मा.पोलिस अधिक्षक मा.मोक्षदा पाटिल व सहाय्यक पोलिस अधिक्षक गोरख भामरे यांचे पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजेंद्र बनसोडे व सहकारी यांनी फुलझांडाची रोपे देवुन स्वागत केले.