भ्रष्ट गूत्तेदार, अधिकारी,कर्मचारी यांना सोडून नागरिक आणि व्यापार्यावर जप्ती ची सक्ती
लातूर/प्रतिनिधि
लातूर -सध्या जिल्हाधिकारी जी श्रीकांत हे लातूर महानगरपालिकेचे प्रभारी आयूक्त आहेत.आपले काम काहीअंशी चांगले पण आहे परंतू,सध्या चालू असलेल्या करभरणा संदर्भात आपन दूटप्पी भूमिका घेत आहात,कर भरणे हे नागरीकांचे कर्तव्यच आहे आणि लातूर कर भरतीलच परंतु न्यायालयाने गूत्तेदार, अधिकारी,कर्मचारी यांच्याकडून वसूलपात्र करोड़ों रूपया ची रक्कम २०१६पासून आजपर्यंत वसूल करण्यात आली नाही,उलट त्यांना कोणत्याना कोणत्या कारणाने पैसे वाटप केले जातात.मग सामान्यतः नागरिक आणि व्यापार्यावर जप्ती ची सक्ती का?असा प्रश्न आता लातूर कर करत आहेत.शारदा कन्स्ट्रक्शन प्रा.ली.नादेड" यांनी केलेल्या कामात झालेल्या भ्रष्टाचारात गुतंलेली रक्कम 58 कोटी 45 लाख 61हजार 437 रुपये वसूल करावेत असा स्पष्ट निर्देश दिला आहे.आँडीट आक्षेपानुसार"शारदा कन्स्ट्रक्शन प्रा.ली.नादेड" यांच्या कडून वसूल करुन त्यांचे डिपॉझिट जप्त करुन काळ्या यादीत टाकण्याचे सोडून उलट त्यांना सूट मिळत आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे.आयुक्तांना सर्व अधिकार असताना,आयूक्त न्यायालयाच्या चक्रव्ह्यूवात अडकून जनतेला न्याय मिळायचे सोडून गूत्तेदार,भ्रष्ट अधिकारी यांनाच न्याय मिळत असल्याचे बोलले जात आहे.मग हे आहवाल,आॅडिट हा सर्व देखावा आहे का?असाही प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे.माननीय जिल्हाधिकार्यांनी यावर गंभीर विचार करून लातूरकरांना न्याय द्यावा एवढी माफक आपेक्षा लातूर कर करत आहेत.