धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी स्वयंम योजनेचा लाभ घ्यावा
लातूर-दि.5-लातूर महानगरपालिका / लातूर शहराच्या ठिकाणी शासकीय तसेच अनुदानीत महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 12वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रिभूत प्रवेश प्रकियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतू शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना या योजनेंतर्गत भोजन निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्याकरीता रक्कम रुपये 43000/- विद्यार्थ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यावर थेट वितरीत करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.
त्यानुसार वर नमूद अभ्यासक्रमाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील योजनेचा विहीत नमून्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय लातूर येथे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तरी धनगर समाजातील गरजू व पात्र विद्यार्थ्यांनी स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बी.जी. अरवत यांनी केले आहे.