Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

हिंगणघाट जळीत प्रकरण: 'पीडितेची मृत्यु शी झूंज'

 


हिंगणघाट जळीत प्रकरण -पीडीतेची मृत्यु शी झूंज


नागपूर -एकतर्फी प्रेमातून प्राध्यपिकेला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेने अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय. या घटनेत ती प्राध्यापिका 40 टक्के भाजली होती. तिच्यावर सध्या नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर असून पुढचे 48 तास महत्त्वाचे असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. श्वासनलिका भाजली असल्याने तिला श्वास घेण्यात अडथळा निर्माण होतोय. तिच्या डोळ्यालाही दुखापत झालीये. तिच्या चेहरा आणि पूर्ण डावा हात मोठ्या प्रमाणात भाजला गेलाय. त्यामुळे तिची परिस्थिती गंभीर आहे. पीडितेच्या श्वसन नलिकेत धूर गेल्याने तिला श्वसनाचा त्रास होतोय. कृत्रिम पाईप टाकून डॉक्टरांनी तिचा श्वास पुन्हा सुरू केलाय. पण धोका अजुन टळलेला नाही.


पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे असून तिच्यावर प्लॅस्टिक सर्जरी करावी लागेल असं डॉक्टरांनी सांगितलंय. अशा पेशंटला इन्फेक्शन हे अतिशय लवकर होतं त्यामुळे अतिशय काळी घ्यावी लागते असंही डॉक्टरांनी सांगिलंय. दरम्यान काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी पीडित प्राध्यापिकेच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.


काय आहे घटना?


आरोपी-विकी नगराळे


एकतर्फी प्रेमातून जाळण्यात आलं आहे. चेहऱ्यावर पेट्रोल ओतल्यामुळे पीडिता गंभीर जखमी झाली आहे. या भीषण हल्ल्यामध्ये तिचा चेहरा संपूर्ण जळाला असून, वाचाही गेली आणि दृष्टीदेखील गेली असल्याची खळबळजनक माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी विकेश नगराळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सत्य काय ते अजून बाहेर यायचे आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक बसवराज तेली हिंगणघाटात दाखल झाले असून या प्रकाराने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे


 


सौ-लोकमत


Previous Post Next Post