Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

स्नेह संमेलन हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा मंच — बस्वराज पाटील नागराळकर

 


स्नेह संमेलन हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा मंचबस्वराज पाटील नागराळकर


उदगीर/प्रतिनिधी/डि.के.उजळंबकर


 उदगीर- शालेय जिवनात वार्षिक स्नेह संमेलन हे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देणारा मंच असतो.अनेक नामवंत कलाकारांची सुरूवात ही अशाच शालेय स्नेह संमेलनाच्या मंचावरुन झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे असे आवाहन कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्था उदगीरचे अध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर यांनी केले.
  ते येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जयहिंद पब्लिक स्कुलच्या दहाव्या वार्षिक स्नेह संमेलनाचे उदघाटक म्हणून बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुधीर जगताप होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद लातूरचे अध्यक्ष राहूल केंद्रे,प्रा.शिवाजी मुळे,महात्मा फुले ग्रामिण विकास संस्था सोनवळाचे सचिव चंदन पाटील नागरगोजे,नगरसेवक गणेश गायकवाड,संस्थेचे कोषाध्यक्ष विठ्ठलराव पाटील,शैक्षणिक संचालक संजय हट्टे,स्कुलच्या शैक्षणिक संचालिका डॉ.अन्नपूर्णा चिंतालुरी,ज्युनिअर काॅलेजच्या प्राचार्या मनोरमा शास्त्री,स्कुलचे उपप्राचार्य सतिष वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
  पुढे श्री.पाटील म्हणाले, जयहिंद पब्लिक स्कुल हे उदगीर तालुक्यातील नंबर एकचे सीबीएसई स्कुल आहे. स्कुलने मिळविलेल्या यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुधीर जगताप व शिक्षकांची मेहनत दिसून येत आहे. हे यश असेच वृध्दींगत व्हावे अशा सदिच्छा दिल्या.
  राहूल केंद्रे यांनी,या बालकलाकारामधूनच उद्याचा  नामवंत नट,नेता,अभिनेता घडणार आहे.त्याच्या कार्याने उदगीर नगरीचा व स्कुलचाही नावलौकीक होईल. त्यासाठी हे मंच उत्तम असल्याचे सांगून संस्थेच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
  अध्यक्षिय समारोपात डॉ.जगताप यांनी,उदगीरच्या शैक्षणिक विकासासाठी सतत प्रयत्नशील राहण्याची ग्वाही देऊन प्रयत्नास राजकीय व सामाजिक पाठिंबा मिळावा अपेक्षा व्यक्त केली. 
  यावेळी स्कुलचा विद्यार्थी गंगाधर रामेश्वर पाटील याची  टी 20 लीगमध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
  कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपज्वलन व स्वामी विवेकानंदाच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. स्कुलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले. 
 प्रास्ताविक सतिष वाघमारे यांनी केले,सूत्र संचलन महेश शिंदे व पद्मजा मूर्ती यांनी केले तर आभार महेश शिंदे यांनी मानले. 
  कार्यक्रमास फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश तोलसरवाड,नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपा अन्बू,उपप्राचार्या ज्योती स्वामी,स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.भिमाशंकर कोडगे,नर्सिंग महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र संगेकर,प्रा.परशुराम पाटील,प्रा.बालाजी गायकवाड,प्रा.राशेद दायमी,प्रा.आसिफ दायमी,प्रा.हनमंत सुर्यवंशी,प्रा.शाहूराज किंवडे,प्रा.कैलास कांबळे,प्रा.बालाजी सकनुरे,प्रा.श्रीपाद अहंकारी,प्रा.पल्लवी कानडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख,प्राध्यापक,  शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक,विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Previous Post Next Post