इस्लामपूर येथे भाजपचे मुंबई अध्यक्ष अशिष शेलार यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन- सांगली जिल्हा शिवसेनेचे वतीने करण्यात आले
सांगली जिल्हा/ प्रतिनिधी/ एकनाथ कांबळे
इस्लामपूर येथे यल्लामा चौक येथील शिव सेनेच्या कार्यालयासमोर सांगली जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांनी एकत्र येऊन शासकिय नियमांचे पालन करीत ! मा.शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या बद्दल अपशब्द वापरले होते त्याचाच निषेध करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील तमाम शिवप्रेमी जनतेने एकत्र येऊन शेलार यांच्या प्रतिमेस जोडे मारून आपला संताप व्यक्त केला आहे!
सांगली जिल्हा अध्यक्ष मा.आनंदरावजी पवार दादा म्हणाले मुंबई हि आजही आमचीच आहे व उद्या हि आमचीच राहणार आहे,या महाराष्ट्राच्या जनतेला शिवसैनिकांनी आदराच स्थान दिले आहे हि जनता हिच आमची खरी देशसंपत्ती आहे म्हणूनच आम्ही म्हणतोय मुंबई आजही आमचीच आहे व उद्या हि आमचीच राहणार तरी शेलार यांनी येथून पुढे बेताल वक्तव्य करून न नकोते उद्योग करून शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा आम्ही खपवून घेणार नाही असे मत व्यक्त केले आहे यावेळी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिवसेनेचे माण्यवर मा.शकिल सय्यद , रणजित गायकवाड,सागर मलगुंडे,राहूल टिबे, घनश्याम जाधव, अंकुश माने व विविध संस्था चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते!