एका समाजकंटका कडून महापुरुषा बद्दल अपशब्द वापरले, कार्यवाही साठी पोलिसांना दिले निवेदन
सांगली/ प्रतिनिधी/ एकनाथ कांबळे
शिराळा तालुक्यातील बहुजन संघटना यांच्या वतीने पोलिस प्रशासन शिराळा यांना'एका समाजकंटका कडून महापुरुषा बद्दल अपशब्द वापरले,त्याच्यावर कार्यवाही साठी निवेदन देण्यात आले आहे.
सद्या सोशल मीडिया फेसबुक,व्हाटसॅअप यांच्या माध्यमातून एका अज्ञात व्यक्तीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरले आहेत व तो व्हिडिओ सद्या झपाट्याने वायरल होत आहे.जाणून बुजून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रेमी या देशातील तमाम जनतेच्या भावना दुखावण्याच्या हेतूने हा प्रकार केला कसल्याचे आमचे मत आहे.
तरी या व्यक्तीवर कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी मा.डाॅ.संदिप कांबळे संविधान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष,व शिराळा तालुक्यातील अनेक सामाजिक संस्था चे पदाधिकारी व कार्यकर्ते व संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष मा.अमर पाटील व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.