लोणीमोडच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छञपती शिवाजी महाराज जंयती उत्साहात साजरी
उदगीर/प्रतिनिधि/डि.के.उजळंबकर
उदगीर (प्रतिनिधी) उदगीर तालुक्यातील लोणीमोड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छञपती शिवाजी महाराज जंयती उत्साहात साजरी करण्यात आली . छञपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेचे पुजन श्री.परशुराम बाबुराव केंद्रे याच्या शुभहास्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय वाघमारे होते प्रमुख पाहूणे परशूराम केंद्रे सुगंधी भाग्यलक्ष्मी अनिल शहा उपस्थित होते यावेळी शिवाजी महाराज याच्या विषयी मनोगत अंकिता सुर्यवंशी, अबुजर शेख, समिर शेख, यासिन शेख, उमर शेख, कातिँक भिगोले, मिराज शेख, श्रुती सुर्यवंशी, आयान वाडेकर, आदि विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी गावातिल पालक व विद्यार्थी उपस्थित होते.