उदगीर,राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बलात्कार ची घटनाआरोपी फरार ,अजब तुझे सरकार
उदगीर/प्रति/डि.के.उजळंबकर
उदगीर मतदारसंघाचे राज्य मंत्री म्हणून संजय बनसोडे यांनी पदभार स्विकारला.परंतू महोदयांच्या मतदारसंघात सामुहिक बलात्कार ची तक्रार ऐन २६जानेवारी रोजी दाखल झाली असून आरोपी मात्र आजून फरार असून पोलिस प्रशासनाला मात्र आरोपी ला पकडण्यात काही रस दिसून रेत नाही.बलात्कार पिडीत बेहाल, पोलिस खाते मालामाल,अशी परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे.
एका महाविद्यालयीन तरूणीवर सामुहीक बलात्काराची घटना घडते, अनआरोपीला मात्र नजरेसमोर असताना अटक होत नाही त्यामुळे या ठिकाणी कायद्याचे तीन तेरा वाजले आसल्याचे संबंधित घटनेवरून दिसून येते.
एकीकडे केंद्र शासन सामुहिक बलात्कार च्या घटनेवर कडक कायदा करत असताना येथे सदर कायदा धाब्यावर बसवत आरोपींना मात्र अटक न करता आपला खिसा गरम करत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. त्यामुळे मंत्री महोदयांच्या मतदारसंघात या घटनेमुळ, नागरिक अजब तूझे सरकार अशी चर्चा करत आहेत.त्यामुळे मंत्री महोदया नी उदगीर कड़े वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरीकांकडून बोलले जात आहे.