लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याची दि 23फेब्रुवारी2020 रोजी लातूर येथे संयुक्त पत्रकार बैठक
अज्ञात वाहनाने ठोकरलेने किल्ले मच्छिंद्र गड येथील दुचाकी स्वार जागीच ठार
सांगली/ प्रतिनिधी /एकनाथ कांबळे
कराड तासगाव मार्गावरती शेणोली ता.कराड हद्दित जोतिबा मंदिर समोरील रस्त्यावरती किल्ले मच्छिंद्र गड येथील आनंदा खंडू पवार वय ५५रा.किल्ले मच्छिंद्र गड येथील गोपाळ समाजातील प्रसिद्ध बॅंड वादक आपल्या स्वताच्या हिरो होंडा क्रमांक MH11-9626या गाडीवरून सातारा हुन आपले गावी परतताना पाठिमागून जोराची धडक दिल्याने मयत आनंदा खंडू पवार हे तोंडावर पडले व डोक्याला व तोंडाला जोरात मार लागल्याने त्यांची जागीच प्राणज्योत मावळली हा अपघात ठिक सायंकाळची ६वाजून ३०मिनीटाच्या अवधीमध्ये झालेला असावा असे स्थानिक नागरिकांनी सांगितले!
आनंदा खंडू पवार हे एक नामवंत बॅंड वादक व्यावसायिक होते त्यांची स्वताची*सरस्वती सर्रास बॅंड पार्टी आहे ते स्वता सातारा येथून बॅंडची सुपारी ठरवून घरी परतताना हा अपघात झाला आहे त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले व मुली व इतर नातेवाईक असा परीवार आहे त्यांच्या अपघाताची बातमी समजताच गोपाळ समाजातील जनतेला मोठा धक्काच बसला आहे असे स्थानिक सुत्रांनी सांगितले आहे ! अपघाताची माहिती मिळताच ईस्लामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पाहनी केली परंतु अपघात कराड तालुक्यातील क्षेत्रात झालेने कराड पोलिस प्रशासन यांना अपघाताची माहिती देण्यात आली बातमी मिळताच कराड पोलिस प्रशासन पदाधिकारी उपस्थित राहिले मयताचा पंचनामा करून मृतदेह कराड येथील काॅटेज रूग्णालया कराड येथे PAMसाठी नेहण्यात आले व डॉक्टर यांच्या परवानगीने मयत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे
या घटनेचा अधिक तपास कराड तालुका पोलिस प्रशासन पदाधिकारी करीत आहेत!