वाहनांची जागीच मोडीत काढून जाहिर लिलावाद्वारे विक्री
लातूर,दि.17- प्रादेशिक परिवहन कार्यालय, लातूर यांचे फिरते पथकामार्फत एस.टी.डेपो, छत्रपती शिवाजी माहाराज चौक, लातूर येथे अटकावून ठेवण्यात आलेल्या एकूण 5 वाहने कार थकित, बेवारस वाहने, जाहिर लिलावाद्वारे विक्री करावयाच आहेत, सर्व वाहने जागीच मोडीत काढून देण्यात येतील.
वाहन क्रमांक वाहनाचा प्रकाराची माहिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर पहावयास मिळेल, पात्र व्यक्ती संस्था यांनी प्रादेशिक परिवहन कर्यालय येथे जाऊन वाहनाचे निरीक्षण करुन रु.20,000/- रुपये रक्कमेचा राष्ट्रीय बँकेचा धनाकर्ष (regional Transport officer latur) यांच्या नावे स्वत:च्या फोटो ओळखपत्रासह खटला शाखेत दि.3 मार्च 2020 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत कार्यालयात जमा करावेत.
जाहिर लिलाव दि 18 मार्च 2020 रोजी सकाळी 10.00 वाजता कार्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे. किमान किंमत न आल्यास किंवा इतर कारणाने लिलाव प्रक्रिया रद करण्याचे अधिकार प्रदेशिक परिवहन अधिकारी यांना राखून ठेवलेले आहे. असे प्रादशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.