नितीन आगे खून खटल्या साठी सरकारी वकीलाची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी गेलेले मंत्र्यांच्या भेटी न झाल्यामूळे राजू आगे मुंबई हून परत
अहमदपूर/ प्रतिनिधि- नितीन आगे खून खटल्यातील फिर्यादी राजू आगे हे त्यांचा मुलाच्या नितीन आगे खून प्रकरणी वकिलांच्या नियुक्ती साठी दिनांक 9 मार्च सोमवार या दिवशी मंत्रालयात गेले असता सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व गृहमंत्री अनिल देशमुख यां मंत्र्यांच्या भेटी न झाल्यामूळे राजू आगे यांनी शासनाचा निषेध व्यक्त केला व मुंबई हून परत निघाले.शासनाने
अद्याप औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठ येथे अपील चालवण्यासाठी वरिष्ठ विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती व फितूर साक्षीदारांवर कारवाई करण्याच्या खटल्यात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती झाली नसल्याने नितीन आगे यांचे वडील राजू आगे यांनी मंत्रालयात मंत्री महोदयांना भेटण्यासाठी गेले परंतु मंत्रालयाय गृहमंत्री अनिल देशमुख व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे दोन्ही ही मंत्र्यांची भेट झाली नाही. राजू आगे यांनी शासनाचा निषेध व्यक्त केला.व परत निघाले त्यांच्या सोबत नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीज NDMJ चे राज्य सचिव वैभवजी गिते महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रा.रमाताई अहिरे व प्रशांत झींने पधिकारी सोबत होते.