जेष्ठ पत्रकार चंद्रकांत मिटकरी यांचे निधन
पत्रकार भवन येथे 11मार्च रोजी श्रद्धाजलीचा कार्यक्रम
लातूर/प्रतिनिधी :- लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार चंद्रकांत रंगनाथ मिटकरी (वय ९०) यांचे आज दि.१०मार्च रोजी सकाळी विवेकानंद रूग्णालयात उपचार सूरू असताना निधन झाले.त्यांच्या मृत्यूचे वार्ता कळताच शहरातील पत्रकारांनी रूग्णालयात गर्दी केली होती.त्यांच्या इच्छेनुसार मृतदेह देहदान करण्यात आले .सांयकाळी ५ वाजेपर्यंंत त्यांचा मृतदेह एमआयटी महाविद्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. उद्या दि.११ रोजी पत्रकार भवन येथे दुपारी 1.00 वाजता त्यांना जिल्हा मराठी पत्रकारसंघाच्या वतीने श्रद्धाजंली वाहन्यात येणार आहे.
चंद्रकांत मिटकरी हे जेष्ठ पत्रकार असून त्यांचे जिल्हा पत्रकार भवन उभारणीत सिंहाचा वाटा होता. त्यांना एकही अपत्य नसून त्यांच्या पत्नीहीचेही निधन मागील काही वर्षापूर्वी झाले होते. निधनाची बातमी पसरताच विवेकानंद रूग्णालयाकडे पत्रकारांने धाव घेतली होती परंतु तेथे पत्रकारांना त्यांचे अंत्यदर्शन घेता आले नाही. त्यात त्यांनी देहदानाचा संकल्प केला असल्याने त्याचा मृतदेह एमआयटी रूग्णालयास दान करण्यात आला सांयकाळी ५ वाजेपर्यंत एमआयटीत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. त्यांना एकही अपत् नाही. त्यांच्या आत्मयास शांती लाभावे म्हणून जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धाजंली अर्पण करण्याचा कार्यक्रम पत्रकार भवन येथे उद्या दि.११ मार्च रोजी दुपारी 01.०० वा ठेवण्यात आला आहे. या श्रद्धाजंली कार्यक्रमास जिल्हयातील पत्रकारांनी, मित्र परिवार यांनी उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे व सचिव सचिन मिटकरी यांनी केले.