Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी 22 अधिकाऱ्यांची नियुक्ती -जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

 


कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी 22 अधिकाऱ्यांची नियुक्ती
                                   -जिल्हाधिकारी जी. श्रीकांत


लातूर,दि.26:- शासनाने करोना विषाणूचा (कोव्हीड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ दि नांक १३.०३.२०२० पासून लागू करून खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. याबाबतची नियमावलीही तयार करण्यात आली असून स्वतंत्ररीत्या निर्गमित करण्यात आली आहे. त्याअन्वये जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. करोना विषाणू संसर्ग  वाढण्‍याची शक्‍यता लक्षात घेता त्‍यावर तात्‍काळ नियंत्रण करणे व विषाणुच्‍या संसर्गात अधिक वाढ होवू  न देता तात्‍काळ  उपाययोजना आखणे आवश्‍यक आहे.  सदर संशयीत रुग्‍णांमुळे  आपत्‍तीजनक परिस्थिती उद्भवू नये यासाठी पूर्व तयारी करणे आगत्‍याचे झाले आहे.
 जिल्‍हाधिकारी तथा  जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण, अध्‍यक्ष जी. श्रीकांत, जिल्‍हयात आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा, २००५ अन्‍वये कोरोना विषाणू प्रतिबंधाच्या कामकाजासाठी खालील प्रमाणे नियुक्‍ती करीत आहे.
अधिका-याचे  नांव व पदनाम, ठिकाण / कार्यक्षेत्र, पार पाडावयाच्‍या जवाबदा-या पुढील प्रमाणे :- 
निवासी उपजिल्‍हाधिकारी, लातूर डॉ. अनंत गव्हाणे 9420205555
जबाबदारी :- 
       1.केंद्र व राज्‍य शासनाच्‍या निर्देशानुसार जिल्‍हा स्‍तरावर मा.जिल्‍हाधिकारी, लातूर यांचे मान्‍यतेने वेळोवेळी आवश्‍यक ते आदेश निर्गमित करण्‍याबाबत योग्‍य ती  कार्यवाही करावी. 2. कोरोना संसर्गाच्‍या अनुषंगाने आवश्‍यकते नुसार वाहन, इमारत अधिग्रहण करणे. 3. नेमणूक करण्‍यांत आलेल्‍या सर्व अधिकारी तसेच इतर अन्‍य विभागाशी समन्‍वय ठेवून आवश्‍यक ती कार्यवाही पार पाडणे. 4.कोरोना विषाणु संसर्गाच्‍या अनुषंगाने सर्वसाधारण नियंत्रण ठेवून आवश्‍यक ती कार्यवाही पार पाडणे. 5.मा.विभागीय आयुक्‍त  कार्यालयाशी  समन्‍वय ठेवणेत यावा  6.भारत सरकार, महाराष्‍ट्र शासन व मा.विभागीय आयुक्‍त यांचेकडील आदेश  व सुचना मा.जिल्‍हाधिकारी यांना अवगत  करणे. 7. मा. विभागीय आयुक्‍त व  जिल्‍हाधिकारी कार्यालय यांचेशी समन्‍वय ठेवणे व आवश्‍यक ती माहिती  मा.विभागीय आयुक्‍त कार्यालयास पुरविणे.
       


 


2) उपजिल्‍हाधिकारी (सामान्य) श्री. व्ही.के.ढगे-(9146815915) 
जबाबदारी :-
   1.विलगीकरण कक्ष करणे व त्‍याचे नियमन करण्या संदर्भात शासनाच्‍या नवीन सुचनांप्रमाणे वेगवेगळया देशातून विमानतळावरुन आलेल्‍या प्रवासी यांची यादी प्राप्‍त करणे व संबंधित यंत्रणेला पूढील कार्यवाहीकरीता उपलब्‍ध करुन देणे 
2. केंद्र व राज्‍य  शासनाच्‍या निर्देशाप्रमाणे विहीत नमुन्‍यातील अहवाल वरिष्‍ठ कार्यालयाकडे पाठविणे या बाबत आवश्‍यक ती कार्यवाही करणे. 3.लातूर जिल्‍हा  कार्यक्षेत्रातील नागरिकांसंदर्भात सनियंत्रणासाठी नेमण्‍यात आलेल्‍या अधिकारी व कर्मचारी यांचेवर संनियंत्रण करणे. 4.सर्व खाजगी रुग्‍णालयाच्‍या ठिकाणी विलगीकरण कक्ष तयार करण्‍यांत आले बाबत खात्री व त्‍याची अद्यावत माहिती घेणे. 5. पूरेशा प्रमाणात खाटांची व्‍यवस्‍था उपलब्‍ध असले बाबत खात्री करणे. 6. खाजगी रुगणालयामध्‍ये खाटा राखीव करणे 7. खाजगी रुग्‍णालयाच्‍या ठिकाणी पुरेशा प्रमाणात उपचार साहित्‍य उपलब्‍ध असले बाबत खात्री करणे. 8. सर्व माहिती नियंत्रण कक्षास कळविण्‍यांत यावी.
3)उपजिल्‍हाधिकारी  (रोहयो), लातूर  श्री. प्रदीप कुलकर्णी – (9423689600)
जबाबदारी :-
 
1.नियंत्रण कक्ष प्रमुख म्‍हणून कामकाज करणे 2.जिल्‍हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्‍त तक्रारीच्‍या अनुषंगाने आवश्‍यक ती कार्यवाही करणे. 3.सर्व नियुक्‍त समन्‍वय अधिकारी यांचेकडून दररोज अहवालाचे एकत्रिकरण करणे. 4.जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक व जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांचेकडील अत्‍यावश्‍यक साहित्‍य खरेदी करणे बाबत जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्‍ध करणेचे अनुषंगाने कार्यवाही करणे. 5. भारत सरकार आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण मंत्रालय,महासंचालक आरोग्‍य सेवा यांनी टूर्स अॅड  ट्रॅत्‍हल्‍स यांचेबाबत दिलेल्‍या मार्गदर्शक सुचनांचे अंमलबजावणी  होते किवा कसे या बाबतचे सर्व टूर्स अॅड ट्रॅत्‍हल्‍स कार्यालयाकडून माहिती घेणे 6.सर्व टूर्स अॅड  ट्रॅत्‍हल्‍स कंपनीकडून कोरोनाग्रस्‍त देशामध्‍ये सहलीस जावून आलेल्‍या पर्यटकाचे यादी प्राप्‍त करुन संबंधित नगरपालीका/नगर पंचायत व  आरोग्य नियंत्रण कक्षास कळविणे. 
7. सर्व टूर्स अॅड  ट्रॅत्‍हल्‍स कंपनीकडून नजीकच्‍या कालावधीत कोरोनाग्रस्‍त देशामध्‍ये सहली आयोजित केलेल्‍या असल्‍यास त्‍या बाबतची माहिती तात्‍काळ नियंत्रण कक्षास कळविणे.
4)उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी, लातूर श्री. संतोष राउत – (9075908869)
जबाबदारी :-
1. Surveillance बाबतच्‍या सुरु असलेल्‍या कामकाजाचे अनुषंगाने माहिती घेणे
2. घर ते घर सर्व्‍हे करण्‍याकरीता नियुक्‍त कलेल्‍या पथकाकडून सर्व्‍हे बाबतची  माहिती प्राप्‍त करुन घेवून नियंत्रण कक्षास कळविणे. 3. जिल्ह्याचा करोना विषाणू प्रतिसाद आराखडा, (SOP) तयार करून घेणे. त्याचा मसुदा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जि.का. लातूर यांचेकडून प्राप्त करून घेणे. 


 



5)जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक,लातूर  डॉ. संजय ढगे-( 9822823773)
जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. परगे – (9822502799)
जबाबदारी :-
1.लॅब नेटवर्क बाबतची अद्यावत माहिती सादर करणे. 2.कोरोना विषाणू प्रतिसादसाठी जिल्ह्यात Incident Commander म्हणून काम पाहणे  3. दैनिक अहवाल दररोज दु. ०१.०० वा. सदर करणे.
6)सर्व उप विभागीय अधिकारी 
लातूर-9423073111,औसा-रेणापूर-9422370239,अहमदपूर 9923897575 निलंगा – 8275516018 उदगीर - 9422769432
सर्व तहसीलदार लातूर जिल्हा
लातूर – 9028875321 औसा- 7038003777 रेणापूर- 7588504237
उदगीर- 9049868999 अहमदपूर- 9422892046 चाकूर 8484938944
जळकोट- 9890743777 निलंगा- 7588930700 देवणी- 9881294665
शिरूर अनंतपाळ-9423727212
जबाबदारी:-
1. सर्व शासकीय/निमशासकीय आस्‍थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचारी  यांना प्रशिक्षण संबंधित यंत्रणेकडून देण्‍यात आले आहे किंवा कसे या बाबतच खात्री करुन अहवाल नियंत्रण कक्षास सादर करणे.
2. Containment Plan काळजीपूर्वक अभ्‍यास करुन आरोग्‍य विभागाच्‍या अधिका-यांशी समन्‍वय करुन या संदर्भात Containment Plan ची यशस्‍वी अंमलबजावणी करणे.
3. Containment Plan मधील मार्गदर्शक सुचना क्रमांक 6.3 रॅपीड रिसपॉन्‍स टिम (RRT)  बाबात दिलेल्‍या मार्गदर्शक सुचने प्रमाणे कार्यवाही करणे.  तसेच  Inter Sectoral Cordination करणे 
4  सर्व माहिती जि.का. कळविण्‍यांत यावी.
5. कोरोना विषाणू संसर्गाबाबत Social Media च्या माध्यमातून अफवा गैरसमज पसरविणांऱ्यावरयोग्य ती कार्यवाई सायबर सेल मार्फत करावी. तसेच अफवांवर  नियंत्रण ठेवावे. 
6. ज्या हॉटेलमध्ये विदेशी नागरिक व इतर राज्‍यातुन येणारे नागरिक मुक्कामी असतील त्या ठिकाणी भेटी देवून खात्री करून घ्यावी. 
8. परदेशीय नागरिक अथवा परदेशातून प्रवास करून आलेले भारतीय  नागरिक या बाबत संबधित पोलीस स्टेशन प्रभारी यांना माहिती वेळोवेळी  देण्याच्या सूचना द्याव्यात .
9. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे गर्दीचे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणारे आयोजक यांना सदर कार्यक्रम आयोजित करू नये अथवा पुढे ढकलनेस याबाबत अवगत करावे अथवा परावृत्त करावे. 
10. आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षित व मार्गदर्शन करावे. 
11. आवश्यकतेनुसार संबंधित व्यक्तीना सुरक्षा विषयक व अत्यावश्यक सेवा पुरवाना-या व्यक्तीना पासेसचे वितरण करावे. 
12. संचारबंदी कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे 
13. वेळोवेळी प्राप्त होणारे आदेश / सुचना पोलीस विभागास निर्गमित करणे. पोलीस विभागाशी समन्वय राखून शासनाकडून/जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त होणा-याआदेशाची अंमलबजावणी करणे. 
7)जिल्‍हा पूरवठा अधिकारी,  श्री भिसे- (9828875321)
24 तास अत्‍यावश्‍यक साहित्‍य मदत कक्ष सर्व तारांकित हॉटेल लातूर जिल्‍हा
जबाबदारी :-
1. जिल्‍हयातील आवश्‍यक त्‍या सर्व हॉस्‍पीटल व इतर ठिकाणी पतिबंधात्‍मक उपाययोजनांच्‍या अनुषंगाने आवश्‍यक ती सर्व प्रकारच्‍या साहित्‍याची  मागणी आरोग्‍य विभागाकडून प्राप्‍त करणे व सबंधित ठिकाणी पोच करणे.
2. सर्व माहिती नियंत्रण कक्षास कळविण्‍यांत यावी.
3. भारत सरकार, आरोग्‍य व कटुंब कल्‍याण मंत्रालय,महासंचालक आरोग्‍य सेवा यांनी हॉटेल व लॉजिंग यांचेबाबत  दिलेल्‍या मार्गदर्शक सुचनांचे अंमलबजावणी होती किंवा कसे या बाबत  खात्री करणे.
4. सर्व हॉटेल मध्‍ये विदेशातून आलेले पर्यटक यांचे तपासणी झाली आहे का या बाबत सर्व हॉटेल यांचेकडून  खात्री करणे.
5. सर्व माहिती नियंत्रण कक्षास कळविण्‍यांत यावी.
6. आयसोलेसेन वार्ड मध्‍ये सर्व सुविधा (चहा,पाणी,जेवणे,पोलीस बंदोबस्‍त,अॅम्‍बूलन्‍स ई.) आहेत का याची खात्री करणे. तसेच या अनुषंगाने  प्राप्‍त तक्रारी बाबत वेळेावेळी आवश्‍यक ती कार्यवाही करणे.
7. सर्व माहिती नियंत्रण कक्षास कळविण्‍यांत यावी.
8)तहसिलदार सर्वसाधारण जि.का. लातूर श्री. महेश परंडेकर-9421492929
लातूर  जिल्‍हयातील सर्व खाजगी रग्‍णालय ठिकाण.
जबाबदारी :-
1. परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती संकलित करावी. ज्या हॉटेलमध्ये व नातेवाईकांकडे  सदर नागरिक मुक्कामास आहे किवा कसे ? त्यांची माहिती  एकत्रित करून जिल्हा रुग्णालयास कळवावी.
2. जिल्हा रुग्णालयाशी समन्वय ठेवावा.
3. मा. विभागीय आयुक्त यांचेकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत प्राप्त निधीचे व जिल्हा नियोजन समिती लातूर कडून प्राप्त निधी आहरण व वितरण करण्याचे आदेश निर्गमित करणे. 
4. सर्व विभागाकडून दररोज प्राप्‍त होणारे अहवाल संकलीत करुन मा.जिल्‍हाधिकारी, मा.विभागीय आयुक्त कार्यालय (सा.प्र.)/नियंत्रण कक्ष यांना इमेलद्वारे सादर करणे. कोरोना संबंधी सर्व देयके विहित वेळेत कोषागारात दाखल करून पाठपुरावा करणे. 
9)जिल्‍हा प्रशासन अधिकारी, नगरविकास शाखा जि. का.लातूर श्री. शिवणे-9011282100
जबाबदारी :-


 1. लातूर जिल्‍हा  हद्दी अंतर्गत नगरपालीका, नगर पंचायत हद्दीत जैविक कच-याची विल्‍हेवाट शास्‍त्रीय पध्‍दतीने लावण्‍याबाबत कार्यवाहीकरणे. 
2. सर्व माहिती नियंत्रण कक्षास कळविण्‍यांत यावी.
3. मनापा/नपा/न.पं यांचे आरोग्य विभागाशी समन्वय साधून माहिती संकलित करणे.  
10)उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,लातूर विजय पाटील- 9371342640
परिवहन अधिकारी यांचे  लातूर जिल्‍हा  कार्यक्षेत्रात
जबाबदारी :-
1. सर्व प्रकारची वाहतूक व्‍यवस्‍था करणे. 
2. सर्व माहिती नियंत्रण कक्षास कळविण्‍यांत यावी.
3. Containment Plan मधील Perimeter Control च्‍या अनुषंगाने वाहना संदर्भात आवश्‍यक ती कार्यवाही करणे.
11)सहा. आयुक्‍त अन्न व औषध प्रशासन विभाग,  श्री. बुगड – (9130492185)
जबाबदारी :-
1. औषध विक्रेते यांनी  जास्त भावाने मास्क विक्री,औषधांची साठेबाजी, संसर्गाबाबत चुकीचे समज पसरवणे इ. बाब निदर्शास आल्यास तात्काळ IC यांना माहिती द्यावी. व योग्य ती कार्यवाई करावी.   
2. सर्व औषध विक्रेते दुकानांची तपासणी करण्यात यावी , त्यांचे माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. औषध विक्रेत्यांना कोरोना संसर्गाबाबत जाणीव करून द्यावी. 
3. औषध विक्रेत्यांना समन्वयक बैठकीचे आयोजन करावे.
12)कार्यकारी अभियंता, महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळ लातूर
श्री.कौसाडीकर- (9594095445)
जबाबदारी :-
एमआयडीसी लातूर  कार्यक्षेत्र 
1. आपआपल्‍या कार्यक्षेत्रातील कंपन्‍या व उद्योग घटकातील अधिकारी व कर्मचारी यांचे परदेश दौरे या बाबतचा अहवाल दररोज नियंत्रण कक्षास सादर करणे. 
2. एम आय डी सी  कार्यक्षेत्रात  Containment Plan   प्रमाणे आवश्‍यक ती कार्यवाही  करणे. 
3. जिल्‍हयात किती कंपन्‍या आहेत, त्‍यात कार्यरत असणारे कर्मचारी संख्‍या पैकी Work at home कर्मचारी किती या बाबत माहिती संकलीत करुन नियंत्रण कक्षास सादर करणे.
4. कोरोना विषाणु संसर्गाच्‍या अनुषगाने जिल्‍हा प्रशासनातर्फे पारित करण्‍यात आलेल्‍या विविध प्रतिबंधात्‍मक आदेशाची अंमलबजावणी करणे.
13)उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्‍य) जि.प. लातूर
श्री. प्रभू जाधव-9422468855
जबाबदारी :-
IEC-Risk Communication Material, Communication Channels, Mask Communication dedicated help line ई. बाबत आवश्‍यक ती कार्यवाही करणे. 
14)उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि.प. लातूर 
श्री. साळुंके-9421583979
जबाबदारी :-
बाहेर गावातून ग्रामीण भागात आलेल्या नागरिकांना विलागीकारण करण्याची कार्यवाही करणे, संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांचेशी समन्वय साधने, गावात स्वच्छता राखणे संबंधी कार्यवाही करणे., ग्रामीण भागात करोना विषयी आवश्यक माहिती वेळोवेळी पोचविणे. 
गर्दीच्या ठिकाणी आवश्यक प्रमाणावर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती करावी. व त्यांचे सहकार्य घ्यावे.    
15)सहायक संचालक (कूष्‍ठरोग), लातूर डॉ. बोरसे- 9422791259
जबाबदारी :-
जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी  व  जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक ,आरोग्‍य विभाग व  शिक्षण  विभाग यांचेशी समन्‍वय साधून कोरोना या संसर्ग आजाराचा लातूर जिल्‍हयामध्‍ये जनजागृती व प्रतिबंधात्‍मक उपाययोजनाकरणे  बाबत  आवश्‍यक  ती  कार्यवाही  करणे. 
16)जिल्‍हा सुचना  व विज्ञान  अधिकारी  (NIC) लातूर
श्री दौलताबाद-(9422464891)
जबाबदारी :-
जिल्‍हा प्रशासनाच्‍या अधिकृत संकेत स्‍थळावर Twitter handle, Facebook page, ई.वर  कोरोनाच्‍या  विषयावर संसर्गाच्‍या अनुषंगाने  आवश्‍यक ती  माहिती वेळोवेळी अद्यावत करणे. 
आपत्कालीन परिस्थितीत जि.का. येथील इंटरनेट सेवा फुल अक्सेस २४ तास कार्यान्वित ठेवणे.
 17)जिल्‍हा माहिती अधिकारी लातूर  श्री. सोनटक्के-8888313851 
जिल्‍हा  माहिती  कार्यालय, लातूर 
जबाबदारी :-
Media Monitoring and Management बाबत आवश्‍यक ती  कार्यवाही करणे.
कोरोना संबंधी अद्यावत माहिती प्रसारित करणे, प्रेस नोट निर्गमित करणे, आय.ई.सी. साठी आवश्यक ती कार्यवाही करणे .


 



18)उपायुक्त, लातूर शहर म.न.पा. श्री. वाघमारे- 9422392248 
जबाबदारी :-


कोरोना प्रतिसाद आराखडा करणे, म.न.पा. आरोग्य विभागाचे मुख्य अधिकारी म्हनुन कामकाज करणे, शहरात विलगीकरण केलेल्या रूग्णाच्या हालचाली वर नियंत्रण ठेवनेसाठी कार्यवाही करणे, आरोग्य विभाग, मनपा, लातूर येथील सर्व कामकाज संचालित करणे, आवश्यक माहिती दररोज जि.का. लातूर याना सादर करणे, कच-याची विल्‍हेवाट शास्‍त्रीय पध्‍दतीने लावण्‍याबाबत कार्यवाही करणे. ई.
19)संगायो शाखा जि.का. लातूर  श्री. महेश परंडेकर-(9421492929)
जबाबदारी :-
इतर विभागाकडून येणारे पत्रावर मा.नि.उ.जि. यांच्या सुचनेप्रमाणे कार्यवाही करणे. (eg. Forwarding letters etc) 
20)जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी लातूर  श्री. गवसाने- 7972989723
जबाबदारी :-
मा. आयुक्त कृषी यांचे पत्र क्र.आकृकक्ष/०३/२०२० कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे दिनांक २४.०३.२०२० अन्वये दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करणे. यामध्ये जिल्ह्यात भाजीपाला, व फळांचा पुरवठा सुरळीत सुरु ठेवणे बाबत कार्यवाही करणे ई.
21)अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, विभाग लातूर 
श्री.माने 7875762021
जबाबदारी :-
जिल्ह्यातील नागरी भागात अत्यावश्यक सेवा पुरविणा-या सर्व शासकीय हॉस्पिटल्स येथे सुरळीत वीजपुरवठा करणे, त्याचबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण/नागरी भागात वीजपुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. 


22)श्री. रेणुकादास देवणीकर, ना.त. पुरवठा विभाग जि.का. लातूर 
मो.क्र. 9421364346
जबाबदारी :-
अत्यावश्यक सेवा पुरविणा-या सर्व यंत्रणांना – नागरिकाना पेट्रोल – डीझेल, गॅस, केरोसीन ई. मिळत असल्याबाबत खात्री करणे, सर्व पेट्रोलपंप चालक आणि पोलीस विभागाशी समन्वय ठेवणे .
 वरील प्रमाणे नियुक्‍ती अधिकारी यांना करोना विषाणु संसर्गाच्‍या अनुषंगाने सर्वसाधारणपणे जवाबदारी देण्‍यात आली आहे. सर्व समन्‍वय अधिकारी यांना देण्‍यात आलेल्‍या जवाबदारीच्‍या अनुषंगाने आवश्‍यक ती कार्यवाही करावी तसेच नियुक्‍त अधिका-यांनी त्‍यांचे अधिनस्‍त मणुष्‍यबळ व साधन सामुग्रीचा यथोचित वापर करुन सदर काम राष्ट्रीय कार्य समजून  सोपविण्यात आलेली जवाबदारी पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्तीव्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.


Previous Post Next Post