Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

जिल्ह्यातील सर्व मेडिकल्स व आठ सुपर मार्केट 24 तास चालू राहणार ,नागरिकांनी मार्केटला गर्दी व जीवनावश्यक वस्तूंचा साठा करु नये

 


जिल्ह्यातील सर्व मेडिकल्स व 
आठ सुपर मार्केट 24 तास चालू राहणार 


नागरिकांनी मार्केटला गर्दी व  जीवनावश्यक वस्तूंचा साठा करु नये


लातूर,दि.24:-शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. याबाबतची नियमावलीही तयार करण्यात आली असून स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात आली आहे. त्या अन्वये जिल्हयाच्या कार्यक्षेत्रात कोव्हीड-19 या प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानुसार विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी  गर्दी  टाळण्यासाठी लातूर जिल्हयात अत्यावश्यक सेवा वगळून प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
अत्यावश्यक सेवा देणारे दुकाने उदा.मेडिकल्स, किराणा दुकाने येथे नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे नागरिकांची ये-जा विभागून देण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हयातील सर्व मेडिकल्स व आठ सुपर मार्केट 24 तास चालू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्तीव्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष जी. श्रीकात यांनी दिले आहेत.
24 तास चालू राहणारे सुपर मार्केट :- 
1)विठाई सुपर मार्केट,लातूर  2) विश्व सुपर मार्केट, बार्शी रोड, /अंबाजोगाई रोड/ औसा रोड/कोकाटे नगर लातूर, 3) पुरुषोत्तम सुपर मार्केट, अंबाजोगाई रोड, लातूर, 4) ए मार्ट, लातूर 5) डी मार्ट लातूर , 6)  बिग बाजार सावेवाडी, लातूर, 7) फ्रेश पोईट, लातूर, 8)  रिलायंस मार्ट, औसा रोड, लातूर.
तसेच याव्यतिरिक्त ज्या अत्यावश्यक आस्थापना यांना 24 तास सेवा सुरु ठेवायची असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास अर्ज करावे. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी  करण्यात यावी . याकरिता 9421373076 या मोबाईलवर संपर्क साधावा असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.


 


Previous Post Next Post