30,000रू ची लाच स्वीकारल्या प्रकरणी हाळी ग्रामपंचायत चा ग्रामसेवक,सरपंच व अन्य एक असे तिन्ही आरोपी लाचेच्या रक्कमेसह ताब्यात.
तक्रारदार यांनी मौजे हाळी ग्रामपंचायत अंतर्गत अल्पसंख्यांक बाहूल योजने अंतर्गत हाळी गावांत केलेल्या शौचालयाच्या कामाचे
बिलाचा 3,65,000 रूपायांचा धनादेश देण्यासाठी ग्रामसेवक, सरपंच व सरपंच बाईचा पती यांनी बिलाच्या 10% प्रमाणे लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ग्रामसेवक व सरपंच यांनी प्रत्येकी 15,000/- रुपये असे एकुण 30,000/- रुपये घेण्याचे मान्य करून, सदर लाचेची रक्कम ग्रामसेवक व सरपंच यांनी प्रत्येकी 15,000/- रुपये अशी एकुण 30,000/- रु स्विकारली.त्यांना दिनांकः- 31/03/2020 रोजी 14.05 वा.1) परशुराम पंढरीनाथ गायकवाड वय-45 वर्षे, रा शाहू कॉलनी, थोडगा रोड, अहमदपूर, जि.लातूरपद-ग्रामसेवक, वर्ग-3, नेमणूक-हाळी ग्रामपंचायत, ता.उदगीर जि.लातूर
2) सौ.प्रझा दयानंद कांबळे वय-36 वर्षे, रा.भिमनगर, अहिल्याबाई होळकर चौक, हाळी, ता.उदगीर जि. लातूर पद-सरपंच, हाळी ग्रामपंचायत
3) दयानंद गोविंदराव कांबळे वय-53 वर्षे, रा. भिमनगर, अहिल्याबाई होळकर चौक, हाळी, ता.उदगीर जि. लातूर या तिन्ही आरोपीला लाचेच्या रक्कमेसह रंगेहाथ पकडण्यात आले.हि कार्यवाही यशस्वी करण्यासाठी TLO :- पोलीस निरीक्षक कुमार दराडे➡ SO :- पोलीस उपअधिक्षक
माणिक बेद्रे,पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे व
लातूर ACB टीमज्ञयांनी परिश्रम घेतले