आ. अभिमन्यू पवार यांच्या हनुमान आराधना कार्यक्रमात हजारो भक्तांनी घेतला महाप्रसाद.
औसा - औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या कुटुंबीयांतर्फे निलंगा तालुक्यातील माकणी (थोर) येथील श्री हनुमान आराधना निमित्त दत्तात्रय पवार, सौ पार्वती पवार, भिमराव पवार, हेमा पवार,परिक्षित पवार, आ.अभिमन्यू पवार ,शोभा अभिमन्यू पवार, यांच्यातर्फे मंगळवार दिनांक 10 मार्च रोजी महापूजा महाभिषेक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
लातूर, औसा, निलंगा, उमरगा, लोहारा, शिरूर अनंतपाळ व देवणी तालुक्यातील भक्तजनांनी दर्शन महाप्रसादासाठी उपस्थित उपस्थिती दर्शवली हजारो भक्तांनी दर्शन व महाप्रसाद घेतला हनुमान आराधना कार्यक्रमानिमित्त आमदार अभिमन्यू पवार यांच्या कुटुंबियांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, माजी खासदार सुनील गायकवाड, महाराष्ट्र राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, भाजपचे युवा नेते शैलेश लाहोटी, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार शोभा पुजारी, संताजी चालुक्य, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब मोरे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव,संतोष मुक्ता, यांच्यासह औसा, निलंगा मतदारसंघातील कार्यकर्ते लोकप्रतिनिधी, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, व्यापार क्षेत्रातील मान्यवर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली.औसा विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टी तून आमदार अभिमन्यू पवार यांना शुभेच्छा देण्यात आल्या .आमदार अभिमन्यू पवार यांना प्रथमच प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने माकणी थोर येथील हनुमान आराधना निमित्त दर्शन व महाप्रसादासाठी अनेकांनी भक्तांना महाप्रसाद वाटपासाठी भक्तिभावाने सहकार्य केले.