दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने लातूर शहरातील सहा पोलिस ठाण्यातील कर्मचारी याना मोफत सॅनिटायझर व मास्क वाटप
लातूर, दि,29,
आज संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूचा संसर्गजन्य रोग मोठ्या प्रमाणात पसरू लागला असुन भारतामध्ये कोरोनाचा संसर्गरोग रोखण्यासाठी शासनाच्या वतीने आटोकाट प्रयत्न केला जात आहे. डॉक्टर व पोलीस यंत्रणा दिवस-रात्र प्रयत्न करीत आहे. ज्या समाजामध्ये आपण राहतो,कार्य करतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हा सामाजिक ऋणानुबंध लक्षात ठेवून लातूर येथील दयानंद शिक्षण संस्थेने पहिल्या टप्प्यात शहरातील पोलिस कर्मचारी याना सॅनिटायझर व मास्कचे मोफत वाटप केले होते आज रविवारी 29 मार्च रोजी दुसऱ्या ट्प्प्यात सकाळी विवेकानंद पोलिस ठाणे,ग्रामीन पोलिस ठाणे येथे सॅनिटायझर व मास्कचे मोफत वाटप दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले असुन आतापर्यंत लातूर शहरातिल 6 पोलिस स्टेशनच्या कर्मचारी याना मास्क व सँनिटायझर वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम संस्थेने केला आहे
यामध्ये दयानंद कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने पुढाकार घेतला असून कला महाविद्यालयातील फॅशन व ड्रेस डिझाईन विभागाच्यावतीने मास्क तयार करण्यात आले. सॅनिटायझरचा मार्केटमध्ये तुटवडा असल्याकारणामुळे दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या प्रयोगशाळेत सँनिटायझर बॉटल तयार करण्यात आले असुन
लातूर शहरातील एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशन, गांधी चौक पोलिस स्टेशन, विवेकानंद पोलीस स्टेशन व लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांना वाटप करण्यात आले
यावेळी सॅनिटायझर व मास्क वाटप एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संजीवन मिरकले, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार पाटील ,श्री.तानाजी चेरले , श्री.लोनेकर दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड,उपप्राचार्य अनिलकुमार माळी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ. संतोष पाटील, कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव, श्री. विवेकानंद देशपांडे यांच्या हस्ते उपस्तीत पोलिस कर्मचारी याना वितरण करण्यात आले
पुढच्या टप्प्यांत महापालिका कर्मचारी याना मास्क देणार
सचिव रमेश बियानी यांची माहिती
लातूर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनाही सॅनिटायझर व मास्क मोफत वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियानी यानी दिली