सातारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पारधी समाज उन्नती मेळावा
सांगली/ प्रतिनिधी /एकनाथ कांबळे
सातारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आयोजित पारधी समाज उन्नती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक मा.श्रीमती तेजस्विनी सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथे मेळावा उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पदाधिकारी मा.मधुकरजी वायदंडे सर संस्थापक अध्यक्ष दलित महासंघ (पारधी हक्क अभियान) संस्थापक,मा.राजेश काळे महापौर सोलापूर नगरपालिका,मा.हरीश पाठने दैनिक पुढारी वॄतसंपादक,मा.सर्जेराव पाटील LCBचे पोलिस निरीक्षक,मा.अशोक तांबे आदिवासी प्रकल्प पदाधिकारी,मा.उमेश चव्हाण मा.सुधाकरजी वायदंडे युवा नेते दलित महासंघ या माण्यवर मंडळीच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला आहे
मा.तेजस्विनी सातपुते म्हणाल्या आदिवासी पारधी समाजातील नागरिकांची जुन्या पिढीतील लोकांचे जीवन हे नसांगता येईल असे गेले आहे परंतू आजच्या युवकांनी शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे व आपले जीवन उंचवीण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्ती सोडून आदर्श नागरिकतेचे जिवन कसे जगता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे
मा.मधूकर वायदंडे म्हणाले मी माझे आत्तापर्यंतचे जिवन हे आदिवासी पारधी समाजातील नागरिकांना सुधारणेसाठी घालवीले आहे आणी येथून पुढे ही मी पारधी कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी व लहान मुलांना शिक्षण घेता आले पाहिजे यासाठी व गुन्हेगारी प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे!