वडिलांचा मृतदेह घरात असताना रितेश ने दिला भूमितीचा पेपर
लातूर/प्रतिनिधि
वडिलाच्या निधनाचे दुःख असतानाही निलंगा शहरातील मिलींद नगर भागातील रितेश कांबळे याने भूमितीचा पेपर दिला.निलंगा येथील मिलिंद नगर चे रहिवासी असलेले मनोज कांबळे यांचे काल दिनांक १३ मार्च रोजी दुपारी आकस्मित निधन झाले. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही मनोज कांबळे यांचा मुलगा रितेश याचा दिनांक १४ मार्च रोजी भूमिती विषयाचा पेपर होता. व १४ मार्च रोजीच वडीलांचा अंत्यविधी होता. जर पेपर नाही दिला तर पुढील शिक्षण घेणे कठीण झाले असते. म्हणून रितेशने पेपर देण्याचा मनाशी निर्धार केला व वडिलांचा मृतदेह घरात असताना निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालय केंद्रावर त्याने पेपर दिला. व त्यानंतर त्यांने जड अंतकरणाने वडिलांच्या चितेला अग्नी दिला.
Tags:
LATUR