Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

कोरोना व्हायरस मूळे उदभवलेल्या परिस्थितीमूळे नोंदनीकृत बांधकाम मजुरांना सरकारने आर्थिक भत्ता, निशुल्क राशन उपलब्ध करून द्यावे

 


कोरोना व्हायरस मूळे उदभवलेल्या परिस्थितीमूळे  नोंदनीकृत बांधकाम मजुरांना सरकारने आर्थिक भत्ता, निशुल्क राशन उपलब्ध करून द्यावे



बीड (प्रतिनिधि )* सध्या जगभरात कोरोना वायरसने थैमान घातलेले असून कोरोना वायरस च्या भितीने भारतातील सर्व कामकाज ठप्प आहे. सर्व कामकाज  बंद असल्याने बांधकामे बंद आहेत. त्यामुळे हातावर
 पोट भरणारे बांधकाम मजूर हे देखील उपासमारीचे शिकार झालेले आहेत. एकिकडे कोरोना सारख्या व्हायरस ची भीती तर दुसरी कडे कूटूंबाची होणारी उपासमार या विवंचनेत एकीकडे आड एकिकडे  विहीर अशीच कहीशी परिस्थिती बांधकाम मजूरांची झालेली आहे.
सदर बांधकाम मजूर हे रोज काम करून आपला  उदरनिर्वाह चालवित असल्याने त्यांची रोजची कमाई बंद असल्या कारणाने मजूर व त्यांच्या घरातील लहाण थोरांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. तरी भारत सरकारने तात्काळ सर्व नोंदनीकृत बांधकाम कामगारांना आर्थिक भत्ता म्हणून त्यांच्या खात्यावर भारत सरकारने तीन महिन्याचे दहा हजार रुपये प्रती महिनाभत्ता व राज्य सरकारने प्रती यूनिट पाच किलो राशन व मास्क .सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे अश्या आशयाने जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मा.मूख्यमंत्री महाराष्ट्र यांना   इमेल वर  निवेदन पाठविण्यात आले आहे निवेदनावर स्वाक्षरी मराठवाडा बांधकाम मजूर व ईतर कामगार संघटनेचेसचिव सय्यद मिनहाजोद्दीन.शफिक पठाण. सय्यद ईलियास.सलाम बागवान यांनी केले आहे 


Previous Post Next Post