Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

शिक्षकांना करोना होत नाही का? खाजगी संस्थाचालकांची मनमानी,.विद्यार्थ्यांना सुट्टी शिक्षक, कर्मचारी मात्र कामावर

 


शिक्षकांना करोना होत नाही का?  खाजगी संस्थाचालकांची मनमानी,.


विद्यार्थ्यांना  सुट्टी, शिक्षक, कर्मचारी मात्र कामावर


लातूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्या आदेशामुळे शैक्षणिक संस्था बंद करण्यात आले आहेत.अनेक गोष्टीवर निर्बंध घातलेले असताना संस्थाचालक मात्र आदेश पाळत नसल्याचे दिसून येत नाहीत. शाळांना सुट्टी असली तरी कर्मचारी शिक्षक त्यांना शाळेत येण्याची शक्ती येत असल्याचे दिसून येत आहे.कोरोना होऊ नये यासाठी राज्य शासनाने गांभीर्याने पावले उचललेली  आहेत.राज्यातील अनेक मंदिरे शैक्षणिक संस्था चित्रपट ग्रह बंद करण्याचे आदेश काढले आहेत लातूर जिल्ह्यातील संस्थाचालक मात्र अधिक गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे यामध्ये आता जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून शिक्षकांना कोरोना होण्यापासून वाचवावे. शिक्षकांना करोना होत नाही का?असा संतप्त सवालही आता शिक्षकाकडून केला जात आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून शिक्षकांना कोरोना होण्यापासून वाचवावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


Previous Post Next Post