उदगीर येथील"स्टार दर्पण न्युज"चँनलचे कार्यालय अज्ञाताकडून जाळण्याचा प्रयत्न
उदगीर-उदगीर येथील"स्टार दर्पण न्युज चँनल व सा.बसव-रत्न"चे कार्यालय मागिल दहा वर्षांपासून नगर परिषद संकुलनात कार्यालय आहे.दि.23/3/2020 च्या मध्य रात्री अज्ञात इसमाकडून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.अंदाजे पेट्रोल टाकून जाळ्यात आला असवा.यात बाहेरील कारपेट,गोदरेज लाँक,आँफिस मधील मँट,एक पडदा जळाला आहे.फार मोठे नुकसान होता होता टळले.सकाळी दहा वाजता आँफिस उघडण्यासाठी आलो असता संपादक सुनिल हावा यांच्या लक्षात येताच ताबडतोब पोलिसांना कल्पना दिल असता तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केरून पुढील तपास पीआय महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय व्यकंट येडके व पो.हे.शेख करीत आहेत. यापूर्वी संपादक सुनिल हावा यांच्यावर एक महिण्यापुर्वी आकसापोटी गुन्हा दाखल करण्यात आला होता.या पुर्वी उदगीर शहरातील अनेक पत्रकारांनवरती आकसापोटी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.संपादक सुनिल हावा यांनी सकाळी आँफिस उघडण्यासाठी आले असता आँफिस जळाण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.असा प्रकार घडलल्याने पत्रकारात भितीचे वातावरण निर्माण झाले.उदगीर शहरात पत्रकारांनी पत्रकारिता करवा का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.