गंजगोलाई ते बाभळगाव दरम्यान शहरबस सेवा सुरु करण्याची नागरिकांची मागणी
लातूर शहरापासून जवळच ५ किलोमीटर अतरावर असलेल्या पालकमंत्री अमित देशमुख यांच्या बाभळगावला जाण्यासाठी गंजगोलाईतून लातूर शहर महानगर पालिकेने शहर बस सेवा सुरु करावी, अशी मागणी सर्वसामान्य प्रवाशी वर्गातून पुढे आली आहे.
बाभळगाव हे पालकमंत्री अमित देशमुख यांचे निवासी गाव आहे.त्यांचा आठवड्यातून काही दिवस येथे दौरा,मुक्काम असतो, त्यामुळे नागरिकांना त्यांच्या भेटीसाठी जाणे-येण्यासाठी शहर बस आवश्यक आहे.बाभळगावला शाळा,महाविद्यालये,काही शासकीय,निमशासकीय कार्यालये आहेत.वाटेत वैशाली नगर असून, बाजूला पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे.आरटीओचे कार्यालय, म्हाडा कॉलनी याच मार्गावर आहे.तसेच या रोडच्या दोन्ही बाजूने नागरी वस्ती असल्याने सामान्य प्रवाशांना ऑटोरिक्षासाठी१० ते १५ रुपये मोजावे लागतात.काही मजूर,कर्मचारी, विद्याथ्यार्ंंनाही या शहर बससेवेचा लाभ होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस या मार्गावरुन अतिशय कमी संख्येेने धावतात,शिवाय त्या विवकानंद चौक,बाभळगाव नाका, म्हाडा,आरटीओ ऑफिस,वेैशाली नगर, पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे थांबत नाहीत.त्यामुळे प्रवाशी नागरिकांची ही निकड लक्षात घेवून लातूर शहर महानगरपालिकेने तातडीने गंजगालाई ते बाभळगाव दरम्यान शहर बस सेवा सुरु करुन नागरिकांची गैरसोय व आर्थिक कोंडी दूर करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक पी.जी.सूर्यवंशी यांनी केली आहे.